पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले, त्याचा कान तुटलेला, ती परिस्थिती सहकार क्षेत्रानं बदलली: शरद पवार

श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ व संयत नेतृत्व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले, त्याचा कान तुटलेला, ती परिस्थिती सहकार क्षेत्रानं बदलली: शरद पवार
sharad pawar
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 2:51 PM

अहमदनगर : श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ व संयत नेतृत्व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शरद पवार यांनी यावेळी माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या आठवणी जागवल्या. अहमदनगरमधील पाण्याचा संघर्ष, सहकारानं शेतकऱ्यांच्या जीवनात घडवून आणलेला बदल, साखर कारखान्यांसमोरील आव्हानं यांसदर्भात भाष्य केलं. शरद पवार यांनी ग्रामीण भाग सहकारामुळं कसा बदलला याचं उदाहरण देऊन सांगितलं. पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले पण त्याचा कान तुटलेला होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. हे चित्र बदलण्यास सहकार उद्योग कारणीभूत आहे, असं शरद पवार म्हणाले.

माझ्या पहिल्या निवडणुकीत तालुक्यात फक्त 6 गाड्या होत्या

शरद पवार म्हणाले की, पूर्वी कारखान्याच्या कार्यक्रमाला लोक ट्रॉलीत यायचे, पण आता चित्र बदललं आहे. 1967 साली मी पहिल्यांदा विधानसभेला उभा होतो तेंव्हा माझ्या तालुक्यात फक्त सहा गाड्या होत्या. पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले पण त्याचा कान तुटलेला होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. हे चित्र बदलल याला कारण सहकार उद्योग आहे, असं शरद पवार म्हणाले.

आज नव्या वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस, आज बापूंच्या आठवण करण्याचा दिवस, त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपण एकत्र आलो आहोत. बापूंच्या डोक्यावर टोपी कधीच असायची नाही, पण इथे पुतळ्यावर टोपी आहे. पण हा पुतळा साक्षात शिवाजीराव नागवडे उभे आहेत अस वाटतं असल्याचं पवार म्हणाले.

लग्न लागल्यानंतर पाणी प्रश्नावर भाषण व्हायची

नगर जिल्ह्यात खूप जागृती असते, पाण्याच्या प्रश्नवरून या जिल्ह्यात खूप वाद व्हायचे. इथे लग्नानंतर भाषणे करायची पद्धत होती. अहमदनगरचा दुष्काळ पाहण्यासाठी इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू आले होते. पण, आता पाणी आलं आहे. परिस्थिती बदलली आहे. माझा नातू रोहित पवारने कर्जत जामखेडचे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली, येत्या दोन ते तीन आठवड्यात बैठक घेऊन आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू, असं शरद पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना जादा पैसे मिळणार

सध्या साखर उद्योग अडचणीतून जात आहे.आता आपण वीज आणि इथेनॉल साखर कारखान्यात तयार करतो. इथेनॉल पेक्षा एक नवीन पदार्थ हायड्रोजन आला आहे. त्यावर आमचा अभ्यास सुरू आहे ते जर सुरू झालं तर शेतकऱ्यांना टनामध्ये जास्त पैसे मिळतील. वीज आणि इथेनॉल मुळे दीडशे ते दोनशे रुपये जास्तीचे शेतकऱ्यांना मिळणार आहेत, असं शरद पवार म्हणाले.

इतर बातम्या:

अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? मलिक यांचे आरोप गंभीर, कॉल रेकॉर्ड चेक करा; मोहित कंबोज यांची मागणी

सॅमचं खरं नाव काय?, डिसूझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप जारी; मलिक यांचा नवा धमाका

VIDEO | धनंजय मुंडेंतर्फे आयोजित कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, मेटे म्हणतात, सामाजिक मंत्र्यांचं भान…

Sharad Pawar said Cooperative industry change the picture of rural Maharashtra

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.