AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : भीमा कोरेगावचा हिंसाचार हे पोलिसांचं अपयश, आयोगासमोर शरद पवारांचा जबाब

भीमा कोरेगावचा हिंसाचार हे पोलिसांचं अपयश आहे. असा जबाब शरद पवार यांनी भीमा कोरेगाव आयोगासमोर दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सर्व यंत्रणा होत्या. मात्र त्यांचा योग्य वापर करून घेता आला नाही, असेही पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar : भीमा कोरेगावचा हिंसाचार हे पोलिसांचं अपयश, आयोगासमोर शरद पवारांचा जबाब
भीमा कोरेगावचा हिंसाचार हे पोलिसांचं अपयश, आयोगासमोर शरद पवारांचा जबाबImage Credit source: TV9
| Updated on: May 05, 2022 | 4:22 PM
Share

मुंबई : भीमा कोरेगावच्या (Bhima Koregaon) हिंसाचाराला आता अनेक वर्षे उलटून गेली तरी त्यावरचा वाद अजूनही संपलेला नाही. भीमा कोरेगावचा हिंसाचार हे पोलिसांचं (Pune Police) अपयश आहे. असा जबाब शरद पवार (Sharad Pawar) यांनी भीमा कोरेगाव आयोगासमोर दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सर्व यंत्रणा होत्या. मात्र त्यांचा योग्य वापर करून घेता आला नाही, असेही पवार म्हणाले आहेत. 2018 ला भीमा कोरेगावच्या लढाईचे 200 वे वर्ष पूर्ण होणार होते, त्यामुळे भीमा कोरेगाव येथे मोठा मेळावा झाला. दरम्यान या कार्यक्रमा दरम्यानच या ठिकाणी हिंसाचार घडला. दोन घट आपसात भिडले. त्यानंतर पोलिसांकडून काही जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे. या प्रकरणाचा तपास आधीच एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर एनआयएनेही काही महत्वाचे जबाब नोंदवले आहेत.

कुणाला अटक, आरोप काय?

या घटनेच्या पोलिस तपासामुळे अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली ज्यांच्यावर त्यांनी माओवादी संबंध असल्याचा आरोप केला. पोलिसांनी आरोप केला आहे की त्यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेच्या सभेला निधी दिला होता, जिथे प्रक्षोभक भाषणे करण्यात आली होती, पोलिसांच्या मते, ज्यामुळे हिंसाचार झाला. 28 ऑगस्ट 2019 रोजी अटक करण्यात आलेल्यांमध्ये लेखक आणि कवी वरावरा राव, वकील आणि कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस आणि मानवाधिकार कार्यकर्ते अरुण फरेरा आणि गौतम नवलाखा यांचा समावेश होता.

आता पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोप

शरद पवार यांनी आता आयोगासमोर पोलीस अपयशी ठरल्याची साक्ष दिल्याने आता पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. असामाजित तत्वांना वेळीच आवर घालण्यात अपयश आल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. तर हा भारतीय जनात पार्टीचा द्वेष आणि मत्सर हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे शरद पवारांना भाजपवर प्रेम असण्याचे कारण नाही. त्यामुळे आता आयोगासमोर अशी साक्ष देऊन भाजप या गोष्टींना कसे जबाबदार आहे. हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र यात कोण जबाबदारर हे आयोग ठरवेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे आमच्या पाच वर्षाच्या सरकारच्या काळात किती हिंसाचार झाला तेही काढा आणि आता अडीच वर्षात किती हिंसाचार काढा असे थेट आव्हानही दरेकरांनी महाविकास आघाडीला दिले आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.