‘नगर जिल्ह्यात लग्न झाल्यावर पाण्यावर भाषणं व्हायची!’ शरद पवारांनी सांगितला किस्सा, बदलत्या परिस्थितीचंही कौतुक
श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ नेतृत्व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शरद पवार यांनी यावेळी माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या आठवणी जागवल्या.
अहमदनगर : ‘दुष्काळ पाहण्यासाठी इंदिरा गांधी आणि पंडित नेहरु आले होते. पण आता पाणी आलं आहे, परिस्थितीत बदलली आहे. नगर जिल्ह्यात खूप जागृती असते. पाण्याच्या प्रश्नावरुन या जिल्ह्यात खूप वाद व्हायचे. इथे लग्नानंतर भाषणे करायची पद्धत होती आणि त्या भाषणात लग्न लागल्यानंतर पाण्यावरुन भाषणं व्हायची’, असा एक किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ नेतृत्व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शरद पवार यांनी यावेळी माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या आठवणी जागवल्या. (Sharad Pawar shared his memories of the water crisis in Nagar district)
आज नव्या वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस आहे. आज बापूंची आठवण करण्याचा दिवस, त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपण एकत्र आलो. बापूंच्या डोक्यावर टोपी कधीच असायची नाही. पण इथे पुतळ्यावर टोपी आहे. पण हा पुतळा पाहून साक्षात शिवाजीराव नागवडे उभे आहेत असं वाटतं. माझा नातू रोहित पवारने कर्जत-जामखेडच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली. येत्या दोन ते तीन आठवड्यात बैठक घेऊन आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू, असं आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिलं.
..तर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील- पवार
साखर उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. आता आपण वीज आणि इथेनॉल साखर कारखान्यात तयार करतो. इथेनॉलपेक्षा एक नवीन पदार्थी हायड्रोयजन आला आहे. त्यावर आमचा अभ्यास सुरु आहे. ते जर सुरु झालं तर शेतकऱ्यांना टनामागे जास्त पैसे मिळतील. वीज आणि इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना दीडशे ते दोनशे रुपये जास्त मिळणार आहेत, असं पवारांनी सांगितलं.
अनेक जिल्ह्यांत सहकारी संस्था मोडकळीस आल्या पण शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात आणि शिवाजी बापू यांनी नगर जिल्ह्यात सहकार जपला व वाढवला. काही लोक चांगलं चाललेलं कसं मोडीत काढायचं यासाठी प्रयत्न करत असतात बापूंनी मात्र अडचणींत आसणा-यांना मदतीचा हात दिला. pic.twitter.com/ATpja17AHZ
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 7, 2021
‘साखर उद्योगामुळे चित्र पालटलं’
पूर्वी कारखान्याच्या कार्यक्रमाला लोकल ट्रॉलीत यायचे. पण आता चित्र बदललं आहे. 1967 साली मी पहिल्यांदा विधानसभेला उभा होतो तेव्हा माझ्या तालुक्यात सहा गाड्या होत्या. पूर्वी परातीत चहा यायचा, नंतर कप आले. पण त्याचा कान तुटलेला होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. हे चित्र बदलण्याचं कारण साखर उद्योग आहे, असा दावाही पवारांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीने पवार साहेबांवर आता जास्त हक्क सांगू नये – थोरात
या कार्यक्रमात बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलीच कोटी केलीय. पवारसाहेब कृषीमंत्री होते तेव्हा मी राज्यात कृषीमंत्रीपद मागून घेतलं होतं. कारण, वर पवार साहेब असल्यामुळे खाली काही कमी पडणार नाही, हे मला माहिती होतं. मला शेजारी बसवून ते संपूर्ण राज्यातील कृषी मंत्र्यांशी चर्चा करायचे. कारण मला शेतीतील समजावं हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं आता साहेबांवर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस शरद पवारांचा तुम्ही आधार घेणार, असं थोरात म्हणाले.
इतर बातम्या :
बुलढाणा सहकारी पतसंस्थेत सापडलेले 53.72 कोटी कुणाचे?; किरीट सोमय्यांचा सवाल
Sharad Pawar shared his memories of the water crisis in Nagar district