पवारांच्या घरावरील राड्यानंतर जयंत पाटलांचं प्रवीण दरेकरांकडे बोट? कुणाचं नाव घेत नसल्याचंही आवर्जुन सांगितलं!

शरद पवारांच्या घरावरीलल हल्ला वकील गुणरत्न सदावर्ते आणि भाजपनं घडवून आणल्याला आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या हल्ल्याबाबत महत्वाचं आणि मोठं वक्तव्य केलंय.

पवारांच्या घरावरील राड्यानंतर जयंत पाटलांचं प्रवीण दरेकरांकडे बोट? कुणाचं नाव घेत नसल्याचंही आवर्जुन सांगितलं!
जयंत पाटील, प्रवीण दरेकरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 10:26 PM

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी शुक्रवारी मोठा राडा पाहायला मिळाला. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) पवारांच्या निवासस्थानावर धडक देत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर पवारांच्या निवासस्थानावर चप्पल आणि दगडंही फेकण्यात आली. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा हल्ला वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आणि भाजपनं घडवून आणल्याला आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या हल्ल्याबाबत महत्वाचं आणि मोठं वक्तव्य केलंय.

महाराष्ट्रात असंतोष निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. पवार यांच्या घरावरील हल्लामागे भाजप किंवा प्रवीण दरेकर आहेत असं आम्ही अजून म्हणत नाही. एकदा पुरावा मिळू द्या, पुरावा मिळाल्यावर बोलायचं असतं आणि बोलायला सुरुवात केल्यावर मग थांबायचं नसतं, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. दरम्यान, जयंत पाटील यांना या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे तर अंगुलीनिर्देश करायचा नाही ना? असा सवाल विचारला जातोय.

आम्ही कुणाचं नाव घेत नाही – पाटील

सरकारच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन आतापर्यंत कधीही पक्षांनी हातात घेतलं नव्हतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात काही पक्ष पुढे होऊन मदत करत होते. त्यामुळे हा हल्ला कुणी राजकीय पक्षाने घडवून आणला का? याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न संपले. चौकशीचा ससेमिरा संपला तरीही सरकार पडत नाही असं ज्या व्यक्तींना वाटतं त्या वक्तीचा यामागे हात आहे का? अशी फक्त शंका आहे, आम्ही कुणाचं नाव घेत नाही, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

अनिल बोंडेंचा राष्ट्रवादीवर पलटवार

दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केलाय. गुणरत्न सदावर्ते आणि 109 एसटी कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवलं जातं आहे. शुक्रवारी शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा सहानुभूतीसाठी राष्ट्रवादीनेच केला असावा, अशी शंका बोंडे यांनी उपस्थित केलीय. तसंच पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर संजय राऊत यांनी सदावर्ते यांचा भाजपशी संबंध असल्याचं सिद्ध करावं, असं आव्हान बोंडे यांनी दिलं आहे.

इतर बातम्या : 

Gunratna Sadavarte : पवारांच्या निवासस्थानावर तुफान राडा, अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या सदावर्तेंच्या रिमांडमधील मुद्दे

St Worker Protest : हे प्रकरण घडवून आणून सहानुभूती मिळवायची होती? पवारांना विचारा, अनिल बोडेंची CBI चौकशीची मागणी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.