शुक्राचार्यांना बाजूला करा; शरद पवारांनी साधला ‘या’ नेत्यावर निशाणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्याच्या कार्यक्रमात बोलताना  एकेकाळचे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला.

शुक्राचार्यांना बाजूला करा; शरद पवारांनी साधला 'या' नेत्यावर निशाणा
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 1:21 PM

अकोले (अहमदनगर): राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्याच्या कार्यक्रमात बोलताना  एकेकाळचे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला. जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही असं म्हणत मधुकर पिचड यांचा पवारांनी शुक्राचार्य असा उल्लेख केला. तर या शुक्राचार्यांना अगस्ती सहकारी साखर कारखान्यातून बाजूल करा कारखान्यासाठी मी तुम्हाला सर्वोतपरी मदत करतो, असं पवार म्हणाले. (Sharad pawar Slam madhukar pichad)

शरद पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवारांचे जुने सहकारी माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी पवारांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात केलेल्या भाषणात त्यांनी पिचडांचा जोरदार समाचार घेतला.

“जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली त्यावेळीच जनतेच्या मनातल मला कळालं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं. किरण लहामटे यांनी वैभव पिचडांना पराभूत करुन ते परिवर्तन घडवून आणलं”, असं पवार म्हणाले.

“अकोल्यातला अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याचं मला कळालं. कारखान्यावर 200 कोटीच‌ं कर्ज झालं आहे. जे या‌ कर्जाला जबाबदार आहे त्या शुक्राचार्यांना बाजूला करा, कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत मी करतो”, असं म्हणत पवारांनी पिचडांवर टीका केली.

विधानसभेला पिचडांचा राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश

मधुकर पिचड हे शरद पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 ला स्थापना झाली. त्यावेळी पवारांसोबत मधुकर पिचड राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक राहिले. पवारांनी पिचड यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. राष्ट्रवादी सत्तेत असताना पिचड कायम लाल दिव्यात राहिले. मात्र प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पिचड यांनी आपल्या मनगटावरचं राष्ट्रवादीचं घड्याळ काढून भाजपचा उपरणं आपल्या खांद्यावर घेतलं.

मधुकर पिचडांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकणं पवारांना आजही खटकतंय…?

एखादा नेता पक्षाला सोडून गेल्यावर शक्यतो पवार त्या नेत्यावर कधी जास्त बोलत नाही किंबहुना त्या नेत्यावर बोलून त्याला अधिक मोठं करत नाहीत. पण पिचड यांच्याबाबत जरा वेगळं आहे. पवारांच्या खांद्याला खांदा लावून मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत निष्ठेने काम केलं. त्यांचं निष्ठेचं फळ पवारांनी त्यांना अनेकदा दिलं मग ते मंत्रिपदाच्या रुपात असेल किंवा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाच्या रुपात असेल. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष अडचणीत होता, पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के बसत होते, अनेक सहकारी सोडून जात होते, अगदी त्याच वेळी पिचडांनीही शरद पवार यांच्यापासून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला जो पवारांना फार मोठा धक्का होता.

अकोल्याच्या उभारणीत माजी आमदार भांगरे यांचा मोठा वाटा- पवार

शरद पवार बोलत होते. यशवंत भांगरे माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग होता, अशी आठवण पवार यांनी जागवली. (Sharad pawar Slam madhukar pichad)

हे ही वाचा

एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं:शरद पवार

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.