Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

पवारांच्या भाषणानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी दोनच घोषणा दिल्या.

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा
Follow us
| Updated on: Oct 19, 2019 | 5:07 PM

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar speech in rain)  यांचं साताऱ्यातील पावसातलं भाषण चांगलंच गाजलं. शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी शरद पवारांनी (Sharad Pawar speech in rain) उभ्या पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असं शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले. तसेच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे असंही नमूद केलं. विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar speech in rain in Satara) यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं.

पवारांच्या भाषणानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी दोनच घोषणा दिल्या. पवारांच्या भाषणावर कौतुकांचा वर्षाव होत असताना, श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्या दोन घोषणा जाता जाता दाद मिळवून गेल्या.

श्रीनिवास पाटील म्हणाले, “मान छत्रपतीच्या गादीला, मात्र तुमचं मत राष्ट्रवादीला……. ढगाला लागली कळंSSSS आणि राष्ट्रवादीला सारी मतं मिळं”

श्रीनिवास पाटलांच्या या दोन घोषणांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्फुरन चढलं.

महाराष्ट्र विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होत आहे. जेव्हा भर पावसात पवारांनी भाषण दिलं, त्याचंवेळी पवारांसोबत सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भिजत होते.

संबंधित बातम्या 

पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले 

कोकाटेंना कोर्टान शिक्षा सुनावल्यानंतरही कारवाई नाही, मोठी माहिती समोर
कोकाटेंना कोर्टान शिक्षा सुनावल्यानंतरही कारवाई नाही, मोठी माहिती समोर.
'दहा वेळा साड्या बदलणारे, भविष्यात..',राऊतांचा भाजपच्या मंत्र्यावर नेम
'दहा वेळा साड्या बदलणारे, भविष्यात..',राऊतांचा भाजपच्या मंत्र्यावर नेम.
धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित? सामंत म्हणाले,तर शिंदेंशिवाय पर्याय
धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित? सामंत म्हणाले,तर शिंदेंशिवाय पर्याय.
'छावा' बघणं 'त्या' दोघांच्या अंगाशी थेट पोलिसांकडून बेड्या, कारण काय?
'छावा' बघणं 'त्या' दोघांच्या अंगाशी थेट पोलिसांकडून बेड्या, कारण काय?.
IND vs PAK आज महामुकाबला, भारताच्या यशासाठी होमहवन अन् देवाला साकडं
IND vs PAK आज महामुकाबला, भारताच्या यशासाठी होमहवन अन् देवाला साकडं.
'नार्वेकरांचं 'ते' म्हणणं म्हणजे धादांत लबाडी', सुषमा अंधारेंचा निशाणा
'नार्वेकरांचं 'ते' म्हणणं म्हणजे धादांत लबाडी', सुषमा अंधारेंचा निशाणा.
धंगेकर सेनेच्या वाटेवर? स्टेटसच्या चर्चांनंतर म्हणाले, जाताना लपून...
धंगेकर सेनेच्या वाटेवर? स्टेटसच्या चर्चांनंतर म्हणाले, जाताना लपून....
हक्काच घर ठाण्यात! म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच, 2 हजार घरांसाठी सोडत
हक्काच घर ठाण्यात! म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच, 2 हजार घरांसाठी सोडत.
छावातील गणोजी गद्दार की खुद्दार? वाद वाढला, शिर्केच्या वंशजाचा आक्षेप
छावातील गणोजी गद्दार की खुद्दार? वाद वाढला, शिर्केच्या वंशजाचा आक्षेप.
'मुंडेंची गुंडागिरी संपलेली नाही', परळी, शिरसाळ्यात धसांना काळे झेंडे
'मुंडेंची गुंडागिरी संपलेली नाही', परळी, शिरसाळ्यात धसांना काळे झेंडे.