… तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल : शरद पवार

अनेक क्षेत्रात लोकांना कमी करण्याचा पर्याय अवलंबला जातोय. हे प्रमाण वाढत राहिलं तर अनेकांच्या हाताला कामच राहणार नाही. पर्यायाने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

... तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल : शरद पवार
Follow us
| Updated on: Sep 02, 2019 | 7:37 PM

बारामती : भांडवली गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत मंदीतून बाहेर पडणं अशक्य असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Econimic slowdown Sharad Pawar) यांनी म्हटलं. देशात निर्माण झालेल्या मंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसलाय. त्यामुळे मागील काही दिवसांत अनेक क्षेत्रात लोकांना कमी करण्याचा पर्याय अवलंबला जातोय. हे प्रमाण वाढत राहिलं तर अनेकांच्या हाताला कामच राहणार नाही. पर्यायाने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही शरद पवार (Econimic slowdown Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी देशात निर्माण झालेल्या मंदीवर भाष्य केलं. सामान्य माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढत नाही, तोपर्यंत व्यापार वाढत नाही. पर्यायाने व्यापार आणि उद्योग वाढवल्याशिवाय मंदीतून बाहेर पडणं शक्य होणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत लोकांना कमी करण्यापेक्षा संबंधित उद्योग संस्थांनी स्वतःचा खर्च कमी करून या संकटाला सामोरं जावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या काबाडकष्टामुळे आज देशात शेतमालाची कमतरता नाही. एकेकाळी आयात करणारा भारत देश निर्यातदार बनलाय. मात्र असं असलं तरी सरकारच्या धोरणामुळे अनेकदा संकटं येतात. शेतमालाचे दर वाढले की परदेशातून माल आयात केला जातो, ही बाब शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत निर्यातीला, विक्रीला आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरवर्षी 16 ते 18 हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याने आत्महत्त्या केली नाही, असा एकही दिवस जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्त्या केली की त्याचं घर उघड्यावर पडतं. कुटुंबातली संकटं कमी होण्याऐवजी वाढतच जातात. त्यामुळे संकटांना धैर्याने तोंड दिलं पाहिजे. खर्च कमी करून, काटकसर करून आणि चुकीच्या गोष्टी टाळून पिकातून दोन पैसे कसे मिळतील याची काळजी घेत या संकटातून बाहेर पडण्याची भूमिका घ्यायला हवी असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.