AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या मेट्रो पाहणीनंतर राजकारण जोरात! ‘यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?’ रोहित पवारांचा चंद्रकांतदादांना टोला

पवारांनी यावेळी मेट्रोची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांच्या मेट्रो पाहणीनंतर राजकारण जोरात! 'यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?' रोहित पवारांचा चंद्रकांतदादांना टोला
रोहित पवार, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 6:09 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यातील मेट्रोची पाहणी केली. पवारांनी यावेळी मेट्रोची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

आदरणीय पवार साहेबांनी मेट्रोची पाहणी केली म्हणून लगेच मेट्रोवर हक्कभंग आणण्याची भाषा? यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती? असो! स्व. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते….”छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता”, असं ट्वीट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केलीय.

चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर नेमकी टीका काय?

पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांचा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘पुणे पिंपरीतल्या आमदार-खासदाराला न कळवता, माननीय शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल केली गेली. पवारांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. ते राज्यसभा सदस्यही आहेत. पण अशा प्रकारे घाईत ट्रायल घेण्याचं काय कारण? यातून श्रेयवादाची लढाई चाललीय का?’

त्याचबरोबर ‘11 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. कंपनीला गॅरेंटी आणि इतर असा केंद्र सरकारने 8 हजार कोटी रुपयांचा वाटा त्यात उचलला आहे. 3 हजार कोटी रुपये महापालिकेने दिले. राज्य सरकारचा काही वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. कोविड परिस्थितीमुळे उशीरा कार्यक्रम घेऊ, असे ठरले होते. पण शरद पवार यांना ट्रायल घेण्याची एवढी घाई कशासाठी झाली?’, असा सवालही पाटील यांनी केलाय.

इतर बातम्या :

Video : ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो!’, नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल, भाजपचा जोरदार हल्लाबोल

‘हिम्मत असेल तर गोव्याला एक मतदारसंघ लढवा, नुसती भाषणं कसली करता’, चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना थेट आव्हान

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.