‘खत दरवाढीला प्रत्यक्षात शरद पवार यांचेच धोरण कारणीभूत’, भाजपची टीका
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खत दरवाढीला प्रत्यक्षात शरद पवार यांचेच धोरण कारणीभूत असल्याचा पलटवार केलाय.
मुंबई : देशात खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे विरोधकांनी केंद्र सरकार आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका सुरु केलीय. त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जातय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी खतांच्या किमती कमी करण्याबाबत केंद्रीय मंत्री सदानंद गौरा यांना पत्र लिहिलंय. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खत दरवाढीला प्रत्यक्षात शरद पवार यांचेच धोरण कारणीभूत असल्याचा पलटवार केलाय. (Sharad Pawar’s policy is responsible for the rise in fertilizer prices – Keshav Upadhyay)
‘आता खत दरवाढी विरोधात पत्र लिहीणारे शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत आहे. तत्कालिन कृषिमंत्री असणाऱ्या शरद पवार व यूपीए सरकार यांच्या निर्णयामुळे खत दरवाढीला सामारे जावे लागले. युपीए सरकारच्या काळात ज्यात शरद पवार कृषिमंत्री होते. त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी 1 एप्रिल 2010 पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले’, असं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.
आता खत दरवाढी विरोधात पत्र लिहीणारे @PawarSpeaks यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत आहे. तत्कालिन कृषिमंत्री असणाऱ्या शरद पवार व #UPA सरकार यांच्या निर्णयामुळे खत दरवाढीला सामारे जावे लागले…२
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 21, 2021
शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
शरद पवार यांनी खत दरवाढीबाबत केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेकांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांवरही या आजाराचा मोठा परिणाम झाला असून त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. मात्र, असं असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचं मी ऐकलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे.
Hence, I would like to request Hon’ble Minister of Chemicals & Fertilizers Shri D. V. Sadananda Gowda ji to personally look into the matter and roll back the price rise at the earliest.@DVSadanandGowda @PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
संबंधित बातम्या :
डीएपीच्या किमती कमी करा, यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या, दादा भुसेंचं केंद्राला पत्र
मोठी बातमी! मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; DAP वर आता 500 नव्हे, तर थेट 1200 रुपयांचे अनुदान मिळणार
Sharad Pawar’s policy is responsible for the rise in fertilizer prices – Keshav Upadhyay