महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर, आयकर विभागाच्या कारवाईवरुन पवारांचा घणाघात

छापेमारीसाठी अजितदादांच्या बहिणींच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्यांचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल काही तक्रारही नाही. पण त्यांच्या हाती काही लागलं नाही तरीही त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. आता मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच-पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केलाय.

महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर, आयकर विभागाच्या कारवाईवरुन पवारांचा घणाघात
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 4:45 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. काही ठिकाणी ही छापेमारी आठवडाभर चालली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. राजकीय आकसानं चौकशी सुरु असल्याचा आरोप पवारांनी केलाय. (Sharad Pawar’s serious allegation that BJP is plotting to destabilize the Mahavikas Aghadi government)

अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. पाच दिवस या धाडी चालल्या. त्यानंतर तिथे जाऊन मी चौकशी केली. अधिकाऱ्यांनी मागितलेली कागदपत्रं पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. छापेमारीसाठी अजितदादांच्या बहिणींच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्यांचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल काही तक्रारही नाही. पण त्यांच्या हाती काही लागलं नाही तरीही त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. आता मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच-पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केलाय.

‘बिचाऱ्या पाहुण्यांचा दोष नव्हता, त्यांना वरुन आदेश होते’

चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. माझ्या घरीही येऊन ते चौकशी करु शकतात. पण चौकशी केल्यानंतर, काम संपल्यानंतर तिथे थांबू नये. पण बिचाऱ्या पाहुण्यांचा दोष नव्हता. त्यांना वरुन आदेश होते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकार अस्थित करण्यासाठी हे पावलं टाकली जात आहेत. तपास यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप पवार यांनी केलाय.

‘महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्यासाठी सर्व सुरु’

महत्वाची बाब म्हणजे काही लोक या छापेमारीचं, कारवाईचं समर्थन करण्यासाठी पुढे आले. खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येतात. कधी माजी मुख्यमंत्री तर कधी भाजपचे मुंबईचे माजी अध्यक्ष पुढे येतात. त्या यंत्रणांचे अधिकारी, त्यांचे प्रवक्ते यांनी भाष्य केलं तर मी समजू शकतो. पण भाजपचे नेते पुढे येतात. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्यासाठी सर्व सुरु आहे. राजकीय आकसानं चौकशी सुरु असल्याचं दिसून येतं, असंही पवार म्हणाले.

जीएसटीचे 35 हजार कोटी कसे थांबवता?

कोळश्याच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोळशाचा पुरवठा करण्याचा आग्रह आपण धरला. पण केंद्र सरकारचे मंत्री रावसाहेब दानवे एक प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र सरकारकडून कोळसा पुरवठा करण्यासाठीचे 3 हजार कोटीचा रुपये आले नाही. त्यामुळे केंद्राला अडचणीला तोंड द्यावं लागत असल्याने कोळसा पुरवठा करण्यात आला नसल्याचं सांगितलं. मी याबाबतची माहिती घेतली. 3 हजार कोटी देणं आहे हे खरं आहे. त्यातील 1400 कोटी रुपये आज किंवा उद्या सरकार देणार आहे. महाराष्ट्राकडून कोळशाची किंमत द्यायला उशीर झाला म्हणून आरोप करतात. दुसऱ्या बाजूला जीएसटीची 35 हजार कोटीचं देणं केंद्राकडे आहे. ते देत नाही. एका बाजूला 35 हजार कोटी रुपये थकवायचे आणि तीन हजार कोटीसाठी कोळसा पुरवठा करायचा नाही. महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करणं योग्य नाही, असं पवार म्हणाले.

इतर बातम्या :

‘आंतरराष्ट्रीय दर कमी झाले तरी पेट्रोल डिझेल महागच,’ मोदी सरकार शरद पवारांच्या निशाण्यावर

Mumbai Drugs Case : ‘पुरावे द्या, मग बोला’, यास्मिन वानखेडे यांचं नवाब मलिकांना आव्हान

Sharad Pawar’s serious allegation that BJP is plotting to destabilize the Mahavikas Aghadi government

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.