पुतण्यासाठी काकी धावली, दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान

दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीने आपली चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोप करण्यात आले आहेत. एसआयटीकडून आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

पुतण्यासाठी काकी धावली, दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान
aditya and sharmila thackerayImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 1:56 PM

अविनाश माने, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, 15 डिसेंबर 2023 : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या राजकीय चुली मांडल्या आहेत. दोघेही एकमेकांवर तिखट शब्दात हल्ला करतात. एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उमेदवारही देतात. अन् दोघे एकत्र येण्याच्या चर्चाही होत असतात. पण दोघेही एकमेकांना टाळी देत नाहीत. दोन्ही भावांच्या राजकीय चुली वेगळ्या असल्या तरी संकटाच्या काळात दोघेही एकत्र येताना दिसतात. मागे उद्धव ठाकरे यांच्यावर सर्जरी झाली होती, तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मातोश्रीवर आले होते. त्यावेळी राज यांनी स्वत: ड्रायव्हिंग केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हाही दोन्ही भाऊ एकत्र आले होते. आता आदित्य ठाकरे हे एका संकटात सापडलेले असतानाच त्यांच्या बचावासाठी काकी शर्मिला ठाकरे आल्या आहेत. शर्मिला ठाकरे यांनी मोठं विधान करून आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वयंरोजगार विभागाकडून महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे मुंबईतील मराठी पत्रकार संघात आयोजन करण्यात आले आहे. ‘उद्योग, कर उद्योग’ या संकल्पनेंतर्गत महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अनेक संधी एकाच मंचावरती उपलब्ध करून देऊन महिलांना उद्योग क्षेत्रा संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होत आहेत. त्यांची चौकशी होणार असल्याचं विचारण्यात आलं. त्यावर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. चौकश्या तर कोणीही लावेल. आम्ही पण त्यातून गेलो आहोत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्याने ठाकरे कुटुंब संकटाच्या काळात एकत्र असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

आपल्याकडे नोकऱ्याच नाहीत

संसदेत घुसखोरी करून दोन तरुणांनी धुडगूस घातला. बेरोजगारीच्या मुद्द्यावर या तरुणांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या देशात 60 टक्के तरुण आहेत. पण आपल्याकडे नोकऱ्या नाहीत. केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. नोकऱ्या नसतात, पण या योजनांमध्ये उद्योग कसा करायचा यासंदर्भात हा कार्यक्रम आहे.अनेक जण आपल्या पाल्यांना कर्ज काढून शिक्षण देतात, मात्र नोकऱ्याच नसल्याने अडचण येते, असं त्या म्हणाल्या.

लोकसंख्या नियंत्रणात आणा

राज ठाकरे यांनीही बेरोजगारांचा मुद्दा मांडला होता. 1993 साली त्याबाबत मोर्चाही काढला होता. त्यावेळेपासून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो अजूनही सोडवलेला नाही. मला वाटतं सरकारनं लोकसंख्या नियंत्रणात आणायला हवी. तेव्हाच हे प्रश्न सुटू शकतील. उद्योजक निर्माण केले पाहिजे. रोजगाराचा सेल असलेला मनसे हा एकमेव पक्ष आहे. आम्ही रोजगार देण्यासाठी काम करतोय. मात्र हे आता मुंबई पुरते मर्यादित न ठेवता राज्यभर पसरायला हवं, असंही त्या म्हणाल्या.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.