Big News : ‘शिंदे गट म्हणजेच शिवसेना’, बंडखोरांचा दावा, सोबत नसणाऱ्यांना अपात्रं करणार

एकनाथ शिंदे सोबत जे आमदार आहेत तीच खरी शिवसेना आहे. एवढेच नाहीतर जे शिंदे गटासोबत नाहीत त्यांनाच अपात्र केले जावे असा दावा केला जाणार आहे.सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर या गटात मोठा आत्मविश्वास दिसून येत असून यातूनच शिवसेना हाच आपला पक्ष असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे.

Big News : ‘शिंदे गट म्हणजेच शिवसेना’, बंडखोरांचा दावा, सोबत नसणाऱ्यांना अपात्रं करणार
एकनाथ शिंदे (संपादित छायाचित्र)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 5:28 PM

मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्यापासून आपलाच गट हीच (Shivsena) शिवसेना असल्याचा दावा केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात या गटाने आता बाळासाहेब शिवसेना असेही गटाचे नामकरण केले होते. पण आता (Cuort) न्यायालयातील सुनावणीनंतर पुन्हा आपला गट हीच शिवसेना आहे. शिवाय जे ह्या गटात नाहीत त्यांनाच पक्षातून काढले जाणार असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत शिंदे गट कोणत्या पक्षात विलिन होणार याला पूर्णविराम मिळाला का असा प्रश्न आहे. दुसरीकडे शिवसेना नेते हे काहीही झाले तरी शिवसेना आपलाच पक्ष राहणार आसल्याचा दावा करीत होते. मात्र, सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर शिंदे गटातील वातावरण बदलले असून जे आमच्यासोबत नाहीत त्यांनाच अपात्र करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता नेमकी शिवसेना आणि पक्ष प्रमुख काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

काय आहे दाखल केलेल्या याचिकेत ?

एकनाथ शिंदे सोबत जे आमदार आहेत तीच खरी शिवसेना आहे. एवढेच नाहीतर जे शिंदे गटासोबत नाहीत त्यांनाच अपात्र केले जावे असा दावा केला जाणार आहे.सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर या गटात मोठा आत्मविश्वास दिसून येत असून यातूनच शिवसेना हाच आपला पक्ष असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जे गटात नाहीत तेच अपात्र?

आतापर्यंत शिंदे गट हा शिवसेना कसा नाही किंवा हे अशक्य असल्याचे शिवसेना नेत्यांकडून वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जात होते. एकतर शिंदे गटाला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा इतर पक्षात सामील व्हावे लागेल असे खुद्द आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील स्पष्ट केले होते. मात्र, सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर शिंदे गटाने आपली भूमिका बदलली आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष..!

कोर्टात सुनावणीनंतर शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे. असे असतानाच दुसरीकडे शिंदे गट हीच शिवसेना असल्याचा दावाही करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर शिंदे गट आणि भाजपामध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुले सत्तास्थापनेची काय समीकरणे आता समोर येणार हे पहावे लागणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.