Maharashtra Politics Crisis : शिंदे विरुद्ध ठाकरे वादात राज्यपालांची एन्ट्री, मविआ सरकारचा पाठिंबा काढण्यासंदर्भात शिंदे गट राज्यपालांना पत्र देण्याच्या तयारीत

Maharashtra Politics Crisis : शिंदे गटाचं पत्र दिल्यानंतर राज्यपाल मुख्यंत्र्यांना पत्र देऊ शकतात, की तुमचं सरकार अल्पमतात आहे. त्यानुसार अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करावं लागले. आता कायदेशीर प्रक्रिया सुरु झाल्याचं दिसतंय, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी 'tv9 मराठी'सोबत बोलताना दिली आहे.

Maharashtra Politics Crisis : शिंदे विरुद्ध ठाकरे वादात राज्यपालांची एन्ट्री, मविआ सरकारचा पाठिंबा काढण्यासंदर्भात शिंदे गट राज्यपालांना पत्र देण्याच्या तयारीत
मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 4:01 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घाडमोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचा गट आज राज्यपालांना (Bhagat Singh Koshyari) पत्र देणार असल्याची माहिती आहे. मविआ सरकारचा पाठिंबा काढण्यासंदर्भात हे पत्र असल्याच माहिती आहे. राज्यपालांना पत्र देण्याची शिंदे गटाची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. शिंदे गट हीच शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा राज्यपालांकडे देणाऱ्या पत्रात केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे सरकार अल्पमतात असल्याचं एकप्रकारे राज्यपालांना शिंदे गटाकडून सांगितलं जाईल. यानंतर राज्यपाल महोदय महाविकास आघाडी सरकारला बहुमद सिद्ध करण्याच्या सूचना देऊ शकतात. यामुळे ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय. यामुळे सरकार अल्पमतात येण्याची देखील शक्यता आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे ‘tv9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले की, शिंदे गटाचं पत्र दिल्यानंतर राज्यपाल मुख्यंत्र्यांना पत्र देऊ शकतात, की तुमचं सरकार अल्पमतात आहे. त्यानुसार अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करावं लागले. आता कायदेशीर प्रक्रिया सुरु झाल्याचं दिसतंय, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी ‘tv9 मराठी’सोबत बोलताना दिली आहे. शिंदे गट हीच शिवसेना असल्याचं पत्र शिंदे गट राज्यपालांना देणार असल्यची माहिती आहे. शिवसेनेपासून शिंदे गटाचे आमदार दूर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची भिस्त विधानसभेचे अपाध्यक्ष झिरवळ यांच्यावर असून आता यावर पुढे काय होतं. ते पाहणं महत्वाचं होणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाकडे किती आमदार?

  1. एकनाथ शिंदे
  2. अनिल बाबर
  3. शंभूराजे देसाई
  4. महेश शिंदे
  5. शहाजी पाटील
  6. महेंद्र थोरवे
  7. भरतशेठ गोगावले
  8. महेंद्र दळवी
  9. प्रकाश अबिटकर
  10. डॉ. बालाजी किणीकर
  11. ज्ञानराज चौगुले
  12. प्रा. रमेश बोरनारे
  13. तानाजी सावंत
  14. संदीपान भुमरे
  15. अब्दुल सत्तार नबी
  16. प्रकाश सुर्वे
  17. बालाजी कल्याणकर
  18. संजय शिरसाठ
  19. प्रदीप जयस्वाल
  20. संजय रायमुलकर
  21. संजय गायकवाड
  22. विश्वनाथ भोईर
  23. शांताराम मोरे
  24. श्रीनिवास वनगा
  25. किशोरअप्पा पाटील
  26. सुहास कांदे
  27. चिमणआबा पाटील
  28. लता सोनावणे
  29. प्रताप सरनाईक
  30.  यामिनी जाधव
  31. योगेश कदम
  32. गुलाबराव पाटील
  33. मंगेश कुडाळकर
  34. सदा सरवणकर
  35. दीपक केसरकर
  36. दादा भुसे
  37. संजय राठोड

पुन्हा एकदा संख्याबळावर चर्चा

खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे सोडल्यास बाकी सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.