शिवाजी पार्कसाठी शिवसेना हायकोर्टात! दसरा मेळाव्यासाठी परवानगी कुणाला मिळणार? मुंबई हायकोर्टात आज सुनावणी!

High Court hearing on Shivaji Park : 1966 सालापासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा दरवर्षी घेतला जातो आहे. बीएमसीनेही दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगीही दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे दसरा मेळाव्यावरुन राजकारण ढवळून निघालंय.

शिवाजी पार्कसाठी शिवसेना हायकोर्टात! दसरा मेळाव्यासाठी परवानगी कुणाला मिळणार? मुंबई हायकोर्टात आज सुनावणी!
आज फैसला..?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 7:38 AM

मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत (Dussehra Melawa, Shivaji Park) आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेच्या (Shivsena News) वतीने पालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र बीएमसीकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. अखेर जी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टात (High Court on Shivaji Park) होणाऱ्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

शिवसेना नेते अनिल देसाई यांनी बुधवारी हायकोर्टात धाव घेतली. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी म्हणजेच आज सुनावणी पार पडेल. या याचिकेद्वारे शिवसेनेनं आता दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा, यासाठी अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. हायकोर्टानेही जर परवानही नाकारली तर शिवाजी पार्कवर घुसून दसरा मेळावा करु, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने याआधीच देण्यात आला होता.

बुधवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा उल्लेख केला. या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं? दसरा मेळाव्यासाठी हायकोर्ट शिवसेनेला परवानगी देतं की नाकारतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

1966 सालापासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा दरवर्षी घेतला जातो आहे. बीएमसीनेही दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगीही दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे दसरा मेळाव्यावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झालाय.

सध्या बीएमसीवर प्रशासकाच्या नेतृत्त्वाखाली कामकाज सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बीएमसीकडून शिवसेनेला सहजासहजी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणं कठीण असल्याचं जाणकारांकडून सांगितलं जात होतं. आता नेमकं तेच पाहायला मिळतंय.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.