AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो, संजय राऊतांकडून शुभेच्छा

राहुल गांधी (Rahul Gandhi) देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून पक्षाची बांधणी वेगाने होवो, देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान बळकट होवो, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो, संजय राऊतांकडून शुभेच्छा
राहुल गांधी आणि संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 10:47 AM
Share

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून पक्षाची बांधणी वेगाने होवो, देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान बळकट होवो, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त (shiv sena foundation day) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, सेना यापुढे देशाच्या राजकारणात प्रखरतेने दिसेल असं सांगितलं. “जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला लोक म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पुढे जाणार नाही. पण शिवसेना महाराष्ट्रभर पसरली, आता महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे” (Shiv Sena foundation day Sanjay Raut said Shiv Sena will be strongly seen in national politics also wishesh Rahul Gandhi on his Birthday)

शिवसेनेच्या आधी आलेले आणि नंतर आलेले राजकीय पक्ष हे काळाच्या ओघात नष्ट झाले. आजही शिवसेना पुढे जाते आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीच दूर होऊ दिला नाही, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना आपली वाटते. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहेत. आज हिंदुत्व म्हटलं की शिवसेना, असंही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना हा मोठा चमत्कार

एक छोटं संघटन म्हणून शिवसेनेची सुरवात झाली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारं हे संघटन आहे. त्यामुळे मुंबईच्या पुढे जाणार नाही, शिवसेनेची धाव पालिकेपर्यंत राहील असं भाकीत केलं गेलं. पण आज शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री आहे. किती आले आणि गेले, शिवसेना कायम आहे. शिवसेनेचा विचार कायम आहे. भारताच्या राजकारणात शिवसेना हा मोठा चमत्कार आहे, असं ते म्हणाले.

शिवसेना प्रखरतेने राष्ट्रीय राजकारणात दिसेल

देशाच्या राजकारणात आपला विचार, आपली भूमिका कायम राहील. भविष्यात आज पेक्षाही जास्त प्रखरतेने शिवसेना राष्ट्रीय राजकारणात दिसेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे कडवं बहुतेक शिवसेनेच्या भविष्यासाठी लिहिलं असावं. दिल्लीचे तख्त राखतो यांना शिवसेनेचा विचार यापुढे महत्त्वाचा राहणार आहे.

राहुल गांधींना शुभेच्छा

राहुल गांधी देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून पक्षाची बांधणी वेगाने होवो, देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान बळकट होवो, असं संजय राऊत म्हणाले. राहुल गांधी हे प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व आहे, देशाप्रती भावना चांगली आहे, येत्या काळात त्यांचं नेतृत्व नव्याने उभं राहील, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या 

यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल; संजय राऊत यांचं मोठं विधान

वर्धापनदिनी सेनेची डरकाळी, अंगावर याल तर ‘हर हर महादेव’ गर्जना करुन हिशेब करु, भाजपला इशारा

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.