शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र

हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 12:26 PM

मुंबई : कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Shiv Sena is trustworthy party Appreciation from  NCP chief Sharad Pawar on NCP vardhapan din)

शरद पवार म्हणाले, “या देशानं अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे 22 वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले”.

आघाडी सरकारचं काम उत्तम

हे आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथं आपण वेगळ्या विचारांचं सरकार स्थापन केलं. कधी वाटलं नव्हतं सेनेबरोबर आपण सरकार बनवू. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल. एव्हढंच‌ नाही तर लोकसभा, विधानसभेला चांगली कामगिरी करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

मविआ सरकार 5 वर्ष टिकणार

सहकाऱ्यांच्या कष्टानं राष्ट्रवादीने 22 वर्ष पूर्ण केले. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे. मविआ सरकार 5 वर्ष टिकणार, नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार, असं शरद पवारांनी सांगितलं.

देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळलं नाही. राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे. पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्वीकारलं, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे. सत्ता एकाच ठिकाणी राहू नये, एकाच ठिकाणी राहिल्याने सत्ता भ्रष्ट होईल, असं पवार म्हणाले.

ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र त्या योग्य नाहीत, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या  

कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही: अजित पवार

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, गोड माणूस चंद्रकांतदादांना शुभेच्छा : संजय राऊत

(Shiv Sena is trustworthy party Appreciation from  NCP chief Sharad Pawar on NCP vardhapan din)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.