हा तर ‘झिंगे गट’अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनिषा कायंदेंचा जोरदार हल्लाबोल

सध्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हा तर 'झिंगे गट'अब्दुल सत्तारांच्या 'त्या' वक्तव्यावर मनिषा कायंदेंचा जोरदार हल्लाबोल
Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 11:05 AM

मुंबई : सध्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. कृषीमंत्री सत्तार हे बीड (BEED) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी आले होते. तेव्हाचा तो व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. अब्दुल सत्तार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच दारू पिता का असा सवाल केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी देखील सत्तार यांच्या या वक्तव्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हटल कायंदे यांनी?

मनिषा कायंदे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे कृषीमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसान पहाण्यासाठी ते आले होते. मात्र ते तिथे जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात तुम्ही दारू पिता का? हा शिंदे गट नाही तर ‘झिंगे गट’ आहे असं म्हणावं लागेल अशी टीका कायंदे यांनी केली आहे. सैराट झाल्यासारखी महाराष्ट्राच्या सत्तेत उलथापालथ घडवली. सत्ता स्थापन केली. आता दौऱ्यासाठी जाता आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारता दारू पिता का म्हणून असं म्हणत मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांमध्ये संताप

दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे . तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याकडून देखील या व्हिडीओवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.