AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी आढळरावांनी शड्डू ठोकला, अभिमन्यू काळेंच्या बदलीला थेट विरोध, ठाकरे सरकारला चॅलेंज

माजी खाजदार शिवाजी आढळराव पाटील (Shiv Sena leader Shivajirao Adhalarao Patil ) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Sarkar)  घरचा आहेर दिला आहे.

शिवाजी आढळरावांनी शड्डू ठोकला, अभिमन्यू काळेंच्या बदलीला थेट विरोध, ठाकरे सरकारला चॅलेंज
Shivaji Adhalrao Patil_Abhimanyu Kale_Uddhav Thackeray
| Updated on: Apr 23, 2021 | 11:26 AM
Share

मुंबई : शिवसेनेचे उपनेते माजी खाजदार शिवाजी आढळराव पाटील (Shiv Sena leader Shivajirao Adhalarao Patil ) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Sarkar)  घरचा आहेर दिला आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणात (remdesivir injection) राज्य सरकारने अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे (Abhimanyu Kale) यांच्या बदलीला आढळराव पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. अभिमन्यू काळे यांची बदली अतिशय चुकीची आणि निषेधार्ह आहे, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. (Shiv Sena leader Shivajirao Adhalrao Patil opposes Maharashtra FDA chief Abhimanyu Kale transfer)

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर आपलं म्हणणं मांडलं आहे. ते म्हणतात, “अभिमन्यू काळे यांना मी जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहित नजरेसमोर ठेवून, त्यांनी आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरं जावं लागलं आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एका प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीला माझा ठाम विरोध आहे. जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्याला माझा जाहीर पाठिंबा आहे”, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं.

अभिमन्यू काळे यांची बदली

 रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवारी 20 एप्रिलला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरून ही बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

एफडीए आयु्क्त काळे यांनी दिलेल्या पत्रामुळे देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाराज होते. काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर काळे यांची बदली करण्यात आली.

कोण आहेत अभिमन्यू काळ?

  • अभिमन्यू काळे हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त होते
  • रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणात त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली
  • अभिमन्यू काळे यांची 21 सप्टेंबरला आयुक्तपदी नियुक्ती झाली होती
  • आता त्यांच्या जागी आता परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी आहे

ब्रूक फार्मा कंपनीवरुन गदारोळ

राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते. भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले. ही घटना योग्य नाही. आपल्या महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकांना दमदाटी करून त्रास देणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या   

VIDEO: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री पोलीस ठाण्यात, पोलीस अधिकाऱ्यांना का घेतलं फैलावर?; वाचा, सविस्तर

रेमडिसिव्हरसाठी भाजपला पत्र देणारे FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली, आव्हाड म्हणतात, मुजोर अधिकारी

भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं: राजेंद्र शिंगणे

(Shiv Sena leader Shivajirao Adhalrao Patil opposes Maharashtra FDA chief Abhimanyu Kale transfer)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.