अचानक भोंगे बंद कसे झाले? शिवसेना नेत्या सुषमा अंधारे राज ठाकरेंवर बरसल्या
कालपर्यंत लावले तो व्हिडिओ म्हणणारा माणूस अचानक बंद कर रे तो व्हिडिओ पर्यंत कसा काय पोचतो? कालपर्यंत भोंगे उतरवण्याची भाषा करत होतात. अचानक भोंग्यांवरून सगळ शांत कसं झाल? भोंगे लावणारे लोक, हनुमान चालीसा वाचणारे लोक हे वेगवेगळे मुद्दे काढून हे ईडीचा गाजावाजा करणारे लोक हे सगळे लोक आता एकदम शांत झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे या सगळ्यांना कुणी कुठे काय बोलायचं याबाबत टाईमिंग देतात. त्यानुसार सर्व जण ठराविक वेळेत बोलत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे(Shiv Sena leader Sushma Andhare ) आक्रमक शैलीने शिंदेगटावर, भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी आपला मोर्चा आता मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे(Raj Thackeray) वळवला आहे. केवळ राजकारणासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर केला जातोय. कालपर्यंत लावा रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस अचानक बंद कर रे तो व्हिडिओ पर्यंत कसा काय पोहचतो? कालपर्यंत भोंगे उतरवण्याची भाषा करणारे भोंग्याच्याबाबतीत अचानक एकदम शांत कसे झाले? राज ठाकरे हे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार वेगवेगळे मुद्दे उकरुन काढत असल्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे.
राज ठाकरेंबाबत काय म्हणाल्या सुषमा अंधारे
जेव्हा माणसाच्या हातात काहीच राहत नाही. सर्व निसटत असताना बाळासाहेब हा एक शब्द आधार देईल म्हणून राज ठाकरे बाळासाहेबांचे नाव घेतात. पक्षीय राजकारणात किंवा युतीच्या राजकारणात विशेषता निवडणूक आणि तिकीट वाटप किंवा सत्ता वाटप याच्या वाटाघाटी असतात त्या चव्हाट्यावर बसून केला जात नाहीत. राज ठाकरे या बैठकांना उपस्थित नव्हते तर त्यांना कुठून दिव्य साक्षात्कार झाला की फडणवीस बोलता ते खरं आणि स्वतःचा भाऊ बोलतोय ते खोटं. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसह सख्खा भाऊ पक्का वैरी असल्यासारखे वागत आहेत.
फडणवीसांनी ठरवून दिलेल्या टाईमिंग भोंगे, हनुमान चालिसा, ईडी सारखे मुद्दे उकरुन काढले जातात
कालपर्यंत लावले तो व्हिडिओ म्हणणारा माणूस अचानक बंद कर रे तो व्हिडिओ पर्यंत कसा काय पोचतो? कालपर्यंत भोंगे उतरवण्याची भाषा करत होतात. अचानक भोंग्यांवरून सगळ शांत कसं झाल? भोंगे लावणारे लोक, हनुमान चालीसा वाचणारे लोक हे वेगवेगळे मुद्दे काढून हे ईडीचा गाजावाजा करणारे लोक हे सगळे लोक आता एकदम शांत झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे या सगळ्यांना कुणी कुठे काय बोलायचं याबाबत टाईमिंग देतात. त्यानुसार सर्व जण ठराविक वेळेत बोलत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
स्वत:च्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचं नाव घेतात
प्रत्येकाच्या हृदयात बाळासाहेब अधिराज्य करत आहेत. बाळासाहेबांचे नाव वगळून राजकारण होत नाही. त्यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी सर्वच जण बाळासाहेबांचं नाव घेतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध कारणे देत शिवसेना सोडली. ही नैसर्गिक युती होती म्हणून आम्ही तोडली आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो कारण बाळासाहेबांचा तो विचार होता आणि हिंदुत्वासाठी गेलो असं जर या लोकांचं म्हणणं असेल तर मग पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला भाजप कोणासोबत गेली होती त्यावेळेला भाजपला नैसर्गिक भीती वाटली नाही का फितूर आहेत आणि सत्तेसाठी वाटेल त्या पद्धतीने राजकारण करतात.
एक दोन आमदार, खासदार इतके तिकडे गेल्याने शिवसैनिक संपत नाही
एक दोन आमदार, खासदार इतके तिकडे गेल्याने शिवसैनिक संपत नाही. शिवसैनिक आमदारांना घडवतात. आमदार शिवसैनिकांना घडवत नाहीत असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.