Sunil Raut : ‘जास्त फंड मिळाला, कुणामुळे? महाविकास आघाडीमुळे’ सुनील राऊतांनी बंडखोरांना सुनावलं
शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला फंड मिळाला आहे. हा फंड महाविकास आघाडीमुळेच मिळाला आहे' असं सुनील राऊत यांनी म्हटलंय.
मुंबई : सिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut News) यांचा सख्खा भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांच्यावरुनही चर्चांना उधाण आलं होतं. सुनील राऊतही गुवाहाटीमध्ये बंडखोर शिवसेना (Shiv sena Rebel MLA) आमदारांच्या गटात सामील होतील, अशी चर्चा होती. या सगळ्या चर्चांवर स्वतः सुनील राऊत यांनी पूर्णविराम लावलंय. आपण शिवसेनेसोबत आहोत, असं विधान त्यांनी केलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ‘बाळासाहेब आणि उद्धव आमचे कुटुंबीय आहेत. जे काही राहिले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राज्यात वाढवू. अनेक मोठे नेते ज्यावेळी पक्ष सोडून गेले, त्यावेळी आम्ही शिवसेना मोठ्या संख्येने वाढवली. आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरेंवर आहे. अडीच वर्षापूर्वीचे त्यांचे रिकॉर्ड बघा. माझ्या दोन्ही मतदार संघात मी फंड खर्च करतोय. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना फंड मिळाला आहे. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला फंड मिळाला आहे. हा फंड महाविकास आघाडीमुळेच मिळाला आहे’ असं सुनील राऊत यांनी म्हटलंय.
समर्थनात बॅनरबाजी
आमदार सुनील राऊत यांच्याकडून शिवसेनेच्या समर्थनात असल्याचे बॅनरही लावण्यात आलेत. आम्ही शिवसेने सोबत, अशा आशयाचे पोस्टर संजय राऊत यांच्या निवास असेलेल्या परिसरात लावण्यात आलेत. सुनिल राऊत सुद्धा शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र संजय राऊत यांनी अखेर या वृत्ताचं खंडण केलंय. आपण मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
बंडखोरांचे आरोप आणि उत्तरं…
बंडखोर शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडातील घटक पक्षांमुळे शिवसेनेचं खच्चीकरण आणि आमदारांना फंड मिळाला नाही, मुख्यमंत्र्यांची भेटीसाठी वेळ दिला नाही, अशी तक्रार आणि आरोप केलेत. हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी बंडखोरांनी केली होती.
पाहा व्हिडीओ :
आतापर्यंत 39 शिवेसना आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर 50 हून जास्त आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला गेलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोरील आव्हानं वाढली आहेत. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोर्टात नेमकं काय घडंल, ायकेड सगळ्यांचं लक्ष लागलंय.