MNS Banner : शिवसेना मनसेचं पोस्टर वॉर कायम, मनसेने लावलेलं बॅनर पोलिसांनी घेतलं ताब्यात

राज्यातलं राजकारण तापल्याचं आपण काही दिवसांपासून पाहतोय. त्यातचं आता मुंबईत शिवसेना (Shivsena) आणि मनसेमध्ये (Mns) पोस्टर वॉर सुरू झालं आहे. मनसेकडून शिवसेना भवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या बदलत्या भूमिकेबाबत पोस्टर लावणार होते. परंतु पोलिसांना त्याची पूर्व सूचना असल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी (Shivaji Park Police) ताब्यात घेतलं आहे.

MNS Banner : शिवसेना मनसेचं पोस्टर वॉर कायम, मनसेने लावलेलं बॅनर पोलिसांनी घेतलं ताब्यात
शिवसेना मनसेचं पोस्टर वॉर कायमImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 10:41 AM

मुंबई – राज्यातलं राजकारण तापल्याचं आपण काही दिवसांपासून पाहतोय. त्यातचं आता मुंबईत शिवसेना (Shivsena) आणि मनसेमध्ये (Mns) पोस्टर वॉर सुरू झालं आहे. मनसेकडून शिवसेना भवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या बदलत्या भूमिकेबाबत पोस्टर लावणार होते. परंतु पोलिसांना त्याची पूर्व सूचना असल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी (Shivaji Park Police) ताब्यात घेतलं आहे. शिवसेना आणि मनसेमध्ये आता हा नवा वाद सुरू झाला आहे. गुरूवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेतबाबत शिवसेनेकडून एक पोस्टर लावण्यात आलं होतं. त्याचं उत्तर म्हणून मनसेकडून दुसरं पोस्टर लावणार होते. मनसेकडून तयार करण्यात आलेल्या पोस्टरवरती एका बाजूला बाळासाहेब ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो होते. गुढी पाढव्याच्या भाषणापासून हे पोस्टरवॉर सुरू झाले आहे.

नेमकं काय झालं ? पोलिसांनी बॅनर ताब्यात घेतलं

काल शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेबाबत पोस्टर लावण्यात आलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही मनसेकडून पोस्टर लावणार होते. ते पोस्टर घेऊन आम्ही उभे असताना पोलिसांनी आमच्या हातातून खेचून घेतलं. तसेच “आम्ही फलक कुठे लावत नव्हतो, घेऊन उभे होतो. आम्ही पोस्टरमध्ये शिवसेनेची कशी बदलती भूमिका आहे. ती आम्ही मांडली होती. प्रत्येकाला हक्क आहे, प्रत्येकाची भूमिका मांडण्याचा,आम्ही आमची भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया मनसेचे दादरचे शाखा प्रमुख संतोष साळे यांनी दिली.

एकामेकाला उत्तर देण्यासाठी बॅनर

गुढी पाडव्याच्या राज ठाकरेंच्या सभेनंतर अनेक ठिकाणी पोस्टरबाजी पाहायला मिळाली आहे. दादर येथील सेना भवनासमोर मनसेकडून ठाकरे बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे चालवत आहेत असं बॅनर लावण्यात आलं होतं. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना समज द्यावी असा देखील बॅनरमध्ये आशय होता. अनेकदा शिवसेनाभवनासमोर बॅनरबाजी करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातो. आज मनसेकडून लावत असलेल्या बॅनरमध्ये एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधी भेट घेतली असल्याचा फोटो आहे. तसेच बॅनरमध्ये काल,आज आणि उद्या असा आशय लिहिला आहे.

Suicide | स्वयंपाकावरुन टोमणे, हुंड्यासाठी छळ, मेहंदी निघण्याआधीच नवविवाहितेची आत्महत्या

Sangli : ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, वीज कोसळल्याने मेंढपाळासह 10 मेंढ्यांचा मृत्यू

विमा पॉलिसी खरेदी करून फसला आहात; नको असलेल्या पॉलिसीमधून अशी करा आपली सुटका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.