शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना 1 वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड! नेमकं प्रकरण काय?

गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपये दंडाची शिक्षा दिलीय. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र, हे चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता.

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना 1 वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड! नेमकं प्रकरण काय?
राजेंद्र गावित, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 5:21 PM

पालघर : महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit) यांनाही पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपये दंडाची शिक्षा दिलीय. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र, हे चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता. त्यानंतर आत राजेंद्र गावित यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

बच्चू कडूंनाही कोर्टाकडून कारावासाची शिक्षा

दुसरीकडे महाविकास आघाडीतील राज्यमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांना तीन दिवसांपूर्वी चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यपद रद्द करा, अशी मागणी याचिकाकर्ते तिरमारे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात जाण्यार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

जिल्हा परिषद निवडणुकीत गावितांना धक्का

खासदार राजेंद्र गावित यांना ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला होता. कारण पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला होता. भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभवाची धूळ चारली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती.

डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत होता. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.

इतर बातम्या :

‘शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आणि उद्या अवघा महाराष्ट्र बोलेल’, संजय राऊतांचा भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांचा निर्वाणीचा इशारा

कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा, अनिल परबांना तुरुंगात जावंच लागेल; किरीट सोमय्या

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.