गंगेच्या किनारी मृतदेहांची विटंबना, महाराष्ट्र मॉडेल लागू करणार का, संजय राऊत गरजले, भारती पवारांचं संयमी उत्तर
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत (Rajya Sabha) आज कोरोनावर चर्चा झाली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत (Rajya Sabha) आज कोरोनावर चर्चा झाली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. “गंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह दफन केले गेले. हे जगाने पाहिलं. त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारही झाले नाहीत. या मृतदेहांची विटंबना झाली, कायदो सांगतो मृतदेहांचा अपमान हे सुद्धा बेकायदा आहे. आम्ही परत एकदा मृतदेहांना मारलं, चिरडलं, अपमानित केलं. मात्र माझा सरकारला सवाल आहे, तुम्ही मृतांचे आकडे का लपवता? सरकारी आकडे आणि प्रत्यक्ष आकडे काही वेगळेच आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला.
Our question is to govt — why are you hiding the data? Tell us, how many people have lost their lives (due to COVID). Reports say more (deaths) than govt’s official figures: Shiv Sena MP Sanjay Raut, in Rajya Sabha pic.twitter.com/tiC9BJbW5W
— ANI (@ANI) July 20, 2021
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे मान्य, पण महाराष्ट्र सरकारच्या कामाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. महाराष्ट्र मॉडेल देशात राबवा असं सुप्रीम कोर्ट म्हणालं, तुम्ही राबवणार का? मुंबई मॉडेलचं कौतुक मद्रास कोर्टाने केलं. कोव्हिड सेंटर, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कोर्टाने काय म्हटलंय ते तुम्ही वाचा, महाराष्ट्र -महाराष्ट्र काय करता, तुम्ही महाराष्ट्र येऊन बघा, सरकार कसं काम करतंय, असं संजय राऊत म्हणाले.
भारती पवार यांचं उत्तर
संजय राऊत यांनी आकडे लपवल्याचा आरोप केल्यानंतर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सरकारकडून उत्तर दिलं. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आपआपली आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सोपवत असते. त्यामुळे केंद्राने आकडे लपवण्याचा प्रश्न नाही. राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशांनीही आकडे लपवल्याचा रिपोर्ट नाही. काही राज्यांनी आकडे सुधारित केले आहेत, असं आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या.
There are no reports of concealing of death by the State/UT government. However, some of states based on the reconciliation of mortality data have revised their figures: MoS Health Bharati Pravin Pawar tells Rajya Sabha
— ANI (@ANI) July 20, 2021
VIDEO : संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या
Sanjay Raut RS LIVE | गंगेत फेकलेल्या मृतदेहांवरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका