मोठी बातमी : संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय?

राज्यातील गुप्त भेटीचा सिलसिला आता शिवसेना-भाजपपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी : संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय?
SANJAY RAUT AND ASHISH SHELAR MEETING
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 7:45 PM

मुंबई : राज्यातील गुप्त भेटीचा सिलसिला आता शिवसेना-भाजपपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात दोन्ही नेत्यांच्या गाड्या कैद झाल्या आहेत. शिवसेना-भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut meet BJP MLA Ashish Shelar before maharashtra assembly monsoon session live update)

गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारण गुप्त भेटीगाठी वाढल्या आहेत. आधी संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेट झाली होती. मग त्यानंतर संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. तिथून ते लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. यानंतर मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया 

राजकारणात अशा भेटी होत राहतात, संजय राऊत आणि आशिष शेलार हे चांगले मित्र आहेत. आम्ही आमचं काम करत राहू आणि ते त्यांचं काम करत राहतील, शिवसेनेनं हात पुढे करण्याचा काही विषय नाही आणि तशी शक्यताही नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

VIDEO : संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त भेट 

फडणवीस-शाहांच्या भेटीत मोदीही सहभागी

महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकींचा (Secret meeting) सिलसिला सुरु असल्याचं दिसतंय. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याही गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.

शिवसेना-राष्ट्रवादीची गुप्त बैठक? 

महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.

सरकार वाचवण्याचा प्रश्न नाही, आम्ही एकत्र : पटोले 

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गुप्त बैठकीचं वृत्त समोर आल्यानंतर, तिकडे स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार वाचवायचा प्रश्नच नाही आम्ही तिघेही सोबत आहोत. सरकार पाच वर्ष चालेल”, असं नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

संबंधित बातम्या 

गुप्त बैठकींचा सिलसिला, देवेंद्र फडणवीस-अमित शाहांची गुप्त बैठक, मग मोदींशीही चर्चा, काय ठरलं?

एकीकडे गुप्त बैठकीची चर्चा, दुसरीकडे स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंची मोठी प्रतिक्रिया

सरकार वाचवण्यासाठी हालचाली, संजय राऊत यांची गुप्त बैठक, कोण कोण उपस्थित?

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.