‘UPA चं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा’, संजय राऊतांचं मोठं विधान

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी UPAचं पुनर्गठन व्हावं, असं म्हटलंय. इतकच नाही तर UPAचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असंही संजय राऊत म्हणालेत.

'UPA चं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा', संजय राऊतांचं मोठं विधान
शरद पवार, संजय राऊत
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 10:26 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA बाबत मोठं वक्तव्य केलंय. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी UPAचं पुनर्गठन व्हावं, असं म्हटलंय. इतकच नाही तर UPAचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असंही संजय राऊत म्हणालेत. राऊत यांनी या मुलाखतीत UPAच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. UPAचं नेतृत्व बदलून, ते अशा हाती देण्यात यावं ज्यांना विरोधक स्वीकारतील, असंही राऊत यांनी म्हटलंय.(Sanjay Raut’s big statement that the chairmanship of UPA should be given to Sharad Pawar)

‘महाराष्ट्रातील प्रयोग उत्तम’- राऊत

राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केलं आहे की, UPAचं पुनर्गठन केलं पाहिजे’. संजय राऊत विचारण्यात आलं की, तुम्ही UPAचे घटक नाहीत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “आता आम्ही NDA(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)तून बाहेर पडलो आहोत. अकाली दलही NDAतून बाहेर पडलाय. ममता बॅनर्जीही UPA किंवा NDA मध्ये नाहीत. असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत जे NDA किंवा UPAचे घटक नाहीत. ते UPA मध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय आहे”.

‘काँग्रेसनं पवारांचं नेतृत्व स्वीकारावं’

राऊत पुढे म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष मजबूत व्हायचं असेल तर UPA मजबूत करायला हवं आणि UPAला मजबूत करायचं असेल तर त्याचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यावे जो अॅक्टिव्ह असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल’. तेव्हा संजय राऊतांना असं कुठलं व्यक्तीमत्व आहे ज्याच्या नावावर सहमती होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी आता तरी फक्त शरद पवार यांचंच नाव समोर येतं. काँग्रेस नेत्यांनी ते स्वीकारायला हवं. शरद पवार यांना UPAचा अध्यक्ष बनवल्यावर UPA अधिक मजबूत होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.

‘सामना’तून खासगीकरणावर प्रहार

पंतप्रधान मोदी व त्यांचे सहकारी राष्ट्राचा विचार करत असतील तर ते राष्ट्रीय संपत्तीचा बोजवारा उडवणार नाहीत. ही सर्व संपत्ती गेल्या सत्तरेक वर्षांत मोठ्या कष्टातून उभी राहिली व त्यात भाजप किंवा मोदी सरकारचे योगदान नाही. जे आपण कमावले नाही ते विकून खायचे हा कोणता धर्म?, असा सवाल करत, ज्यांनी हे सर्व तुमच्यासाठी कमवून ठेवले त्यांना रोज लाथा घालायच्या हेच सध्या सुरु आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

संसद भवनाची मालकी तरी भारतातील लोकांकडे राहू द्या

स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव पुढच्या काळात साजरा होईल त्या वेळी 75 वर्षांच्या काळात निर्माण केलेल्या राष्ट्रीय संपत्तीचा लिलाव झालेला असेल. मग नवे काय उभे राहिले, तर एक हजार कोटी रुपये खर्च करून निर्माण होणारे नवे संसद भवन! संसद भवनाची मालकी तरी भविष्यात स्वतंत्र हिंदुस्थानच्या लोकांकडे राहू द्या इतकेच! अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

“राष्ट्रीय संपत्ती गेल्या 70 वर्षांतली, त्यात तुमचं योगदान काय? जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?”

कश्मीर खोऱ्यात दहशतवादाची पाळेमुळे आजही कायम, जवानांचं बलिदान थांबणार कधी?, सेनेचा सवाल

Sanjay Raut’s big statement that the chairmanship of UPA should be given to Sharad Pawar

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.