AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा तपास CBI कडे द्या, शिवसेना खासदाराची मागणी

खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शून्य प्रहरात खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच हे प्रकरण तपासासाठी CBIकडे देण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा तपास CBI कडे द्या, शिवसेना खासदाराची मागणी
sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 10, 2021 | 2:30 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन मृत्यू आणि खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. मनसुख हिरेन प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपनं लावून धरली आहे. तर दुसरीकडे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, या मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याची मागणी आता शिवसेनेच्या एका खासदारांनं केली आहे.(Vinayak Raut’s demand to hand over the investigation of MP Mohan Delkar’s case to CBI)

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शून्य प्रहरात खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच हे प्रकरण तपासासाठी CBIकडे देण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विनायक राऊतांनी केलीय. मुंबई पोलीस, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी भाजपच्या खासदारांनीही संसदेत आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात अखेर गुन्हा

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहेत. तसेच दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावरही गुन्ह दाखल करण्या आला आहे. डेलकर यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी काल मला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

पटेल मोदींचे सहकारी, देशमुखांचा हल्ला

दरम्यान, काल अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरमावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. प्रफुल्ल खेडा पटेल हे सध्या दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते आधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पटेल हे गुजरातचे गृहमंत्री असावेत असा माझा कयास आहे. त्यानंतर पटेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं देशमुख म्हणाले होते. त्यावरून सभागृहात एकच गदारोळ माजला होता.

संबंधित बातम्या :

Mansukh Hiren Death Case : मनसुख हिरेन, मोहन डेलकर, सचिन वाझे ते फडणवीसांना धमकी? विधानसभेत नेमकं काय घडलं?

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीद्वारे करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

Vinayak Raut’s demand to hand over the investigation of MP Mohan Delkar’s case to CBI

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...