राजधानी दिल्लीत शिवसेना खासदारांची महत्वपूर्ण बैठक, मरगळ झटकण्यासाठी व्यूहरचना तयार?

शिवसेनेकडूनही आता मरगळ झटकून कामाला लागण्याची तयारी सुरु झालीय. राजधानी दिल्लीत आज शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार ही बैठक पार पडल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलीय.

राजधानी दिल्लीत शिवसेना खासदारांची महत्वपूर्ण बैठक, मरगळ झटकण्यासाठी व्यूहरचना तयार?
संजय राऊत, खासदार, शिवसेनाImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 5:19 PM

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) चार राज्यात भाजपनं सत्ता राखली. तर पंजाबसह पाचही राज्यात काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला. उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपला टक्कर देण्यासाठी मैदानात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेची अनामत रक्कमही वाचू शकली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुका (Municipal Elections) लक्षात घेता भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अशावेळी शिवसेनेकडूनही आता मरगळ झटकून कामाला लागण्याची तयारी सुरु झालीय. राजधानी दिल्लीत आज शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सुचनेनुसार ही बैठक पार पडल्याची माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलीय.

नवी दिल्लीत पार पडलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. 22 मार्चपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत शिवसेनेचे खासदार विदर्भ आणि मराठवाड्यात जनतेशी संवाद साधणार आहेत. कुठे मरगळ आली असेल तर ती झटकून टाकावी यासाठी शिवसेना खासदार राज्याचा दौरा करणार आहेत, तशी माहितीही संजय राऊत यांनी दिलीय.

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. हा सिनेमा भाजपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधान स्वत: त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्याचबरोबर ’32 वर्षापूर्वीचा आक्रोश, इतिहास, वेदना त्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचं कौतुक केलं पाहिजे. या सिनेमात अनेक सत्य दडपली आहेत. ताश्कंद फाईल हा सिनेमा त्याच निर्मात्याकडून प्रसिद्ध झाला आणि लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं खापर एका कुटुंबावर फोडण्यात आलं. हा एक राजकीय अजेंडा या माध्यमातून राबवला जात आहे’, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

अतुल भातखळकरांचं राऊतांना प्रत्युत्तर

दरम्यान, संजय राऊतांच्या या टीकेला आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केलीय. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर फाइल्स चित्रपटाचे प्रचारक असून भाजपवाले राजकीय अजेंडा राबवत आहेत, हे संजय राऊत यांचे विधान म्हणजे शिवसेना हिरवी होत असल्याचे निदर्शक आहे. ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांची नसून सोनिया मॅडम आणि जाणते पवार यांच्या रिमोटवर चालणारी शिवसेना आहे’, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय.

इतर बातम्या :

फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल

शरद पवार-संजय राऊतांमध्ये 20 मिनिटं खलबतं, चर्चा गुलदस्त्यात

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.