Shiv Sena : हीच का मराठी अस्मिता..! मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेचा शिंदे सरकारला सवाल, नेमका मुद्दा काय?
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात लॉटरी लागली ती औरंगाबाद जिल्ह्याची. या जिल्ह्यामध्ये तीन कॅबिनेट पदे मिळाली आहेत. यामध्ये शिंदे गटाकडून दोन तर भाजपाकडून एक कॅबिनेट देण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबईतील एकाही मराठी आमदाराचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही. अशा प्रकारची वागणूक ही दुर्देवी असून यामागची कारणेही समोर येणे गरजेचे असल्याचे मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : एकीकडे (Eknath Shinde) शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसल्याची टिका विरोधकांकडून केली जात आहे. तर ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आणि इतर पक्षातून आलेल्यांनाच संधी दिल्यावरुनही भाजपावर टिका होत असताना शिवसेनेचे (Sachin Ahir) आ. सचिन अहिर यांनी मात्र, (Mumbai MLA) मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रिपद दिले गेले नसल्यावरुन शिंदे सरकावर बोचरी टिका केली आहे. जो मराठीचा मुद्दा घेऊन या आमदारांनी बंड केले त्यांना मराठी अस्मितेचा विसर पडला की काय असे म्हणत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ विस्तारावर टिकेचे बाण सोडण्यात आले आहेत. मराठी अस्मिता सांगणाऱ्या लोकांना मराठी आमदार मुंबईतून मिळाला नाही का असे म्हणत अहिर यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले आहे.
मुंबईतील मराठी आमदारांचा समावेश नाही
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात लॉटरी लागली ती औरंगाबाद जिल्ह्याची. या जिल्ह्यामध्ये तीन कॅबिनेट पदे मिळाली आहेत. यामध्ये शिंदे गटाकडून दोन तर भाजपाकडून एक कॅबिनेट देण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबईतील एकाही मराठी आमदाराचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही. अशा प्रकारची वागणूक ही दुर्देवी असून यामागची कारणेही समोर येणे गरजेचे असल्याचे मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले आहे. केवळ नाराजीचा फटका सरकारला बसू नये एवढेच या विस्तारावरुन समोर येत असल्याचेही अहिर म्हणाले आहेत.
पुढच्या विस्तारात तरी संधी मिळावी
पहिल्या मंत्रिमंडळात जरी मुंबईतील मराठी आमदरांचा समावेश झाला नसला तरी पुढील विस्तारात संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत अहिर यांनी शिंदे सरकारला टार्गेट केले आहे. आमदारांनी ज्या उद्देशाने शिंदे गटात प्रवेश केला तो तरी साध्य झाला का असाच सवाल अहिर यांनी केला आहे. त्यामुळे मुंबईतील मराठी आमदरांना किमान पुढील विस्तारात तरी संधी मिळेल अशी आशा असल्याचे अहिर यांनी सांगितले आहे.
मराठी अस्मितेचे केवळ राजकारण
शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असले तरी मंत्रिमंडळ किती मजबूत झाले आहे हे सरकारकडून सांगितले जात आहे. शिवसेनेने मात्र, मुंबईतील मराठी माणूस पुढे करीत सरकारवर टिका केली आहे. मराठी अस्मितेच्या बाबतीत अनेक मोठी आश्वासने शिंदे सरकारने दिले आहेत. प्रत्यक्षात मंत्री पद देऊन ही अस्मिता कायम ठेवण्याची त्यांच्याकडे होती. मात्र, याच मुंबईतील मराठी आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश नाही यापेक्षा दुर्देव ते काय असेही अहिर म्हणाले आहेत.