35 वर्ष घरावर तुळशीपात्र ठेवले की घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला? ; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटावर घणाघात
त्यांनी गेले 35 वर्ष शिवसेनेची सेवा करत, आंदोलनात सहभागी होत घरावर तुळशीपात्र ठेवले की, घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला असा सवाल करत शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या संजना घाडी यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादा भुसे, रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटील, दादा भुसे, रामदास कदम यांनी गेले 35 वर्ष शिवसेनेची सेवा करत, आंदोलनात सहभागी होत घरावर तुळशीपात्र ठेवले की, घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला असा सवाल संजना घाडी यांनी केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सत्तेत असताना शिवसेनेसोबत होते. मात्र शिवसेनेची आता सत्ता जाणार आहे, असे दिसताच ते गद्दारांना जाऊन मिळाले असा घणाघात संजना घाडी यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या घाडी?
संजना घाडी यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 35 वर्ष शिवसेनेची सेवा करत, आंदोलनात सहभागी होत घरावर तुळशीपात्र ठेवले की, घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला असा सवाल संजना घाडी यांनी केला आहे. सतत्ते असताना शिवसेनेसोबत होते. अनेक पदे उपभोगली, मात्र आता सत्ता जाणार आहे असे दिसताच त्यांनी शिवसेनेला सोडले, गद्दारांना जाऊन मिळाले असं घाडी यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारेंचं कौतुक
दरम्यान यावेळी संजना घाडी यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचं देखील कौतुक केलं आहे. शिवसेनेची सत्ता गेली तेव्हा अनेक नेते बाहेर पडले. मात्र आता शिवसेनेची सत्ता नाही, त्यामुळे आपल्याला कोणतंही पद मिळणार नाही, हे माहित असूनही सुषमा अंधारे या शिवसेनेत आल्या. त्यांनी केवळ शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला. त्या आपल्यावरील टीकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत, त्यामुळे आम्हाला अशा वाघिणीचा अभिमान वाटतो, असे घाडी यांनी म्हटलं आहे.