शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं शिवसेनेकडून स्वागत, पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच – अरविंद सावंत

देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत.

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं शिवसेनेकडून स्वागत, पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच - अरविंद सावंत
शरद पवार, प्रशांत किशोर आणि अरविंद सावंत
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 3:45 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीचं शिवसेनेकडून स्वागत करण्यात आलंय. महाविकास आघाडी शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलंय. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक झाली. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. (ShivSena welcomes meeting between Sharad Pawar and Prashant Kishor)

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे. त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलंय, असंही सावंत यांनी म्हटलंय.

पवार-किशोर भेट, चर्चेला उधाण

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी पोहोचले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेनं रवाना झाले. या भेट राजकीय नसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरुन या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार, प्रशांत किशोर भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा

देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार?

बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीवर चर्चा,

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरही चर्चा,

पुढील काळात राष्ट्रवादीची रणनिती आणि राजकीय कार्यक्रमाबाबत चर्चा

‘भाजप नेते संकुचित मनाचे बनले आहेत’

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन सध्या सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय. भाजपच्या नेत्यांना पोटशूळ उठत आहे. ते संकुचित मनाचे झाले आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी दिलदारी लागते. मृणाल गोरे आयुष्यभर शिवसेनेच्या विरोधात लढल्या, पण त्या पुलाला मृणाल गोरे यांचंच नाव दिलं, असं सावंत म्हणाले. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे. भाजप आणि रिपाईंकडूनही या प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा देण्यात आलाया. तर शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम आहेत.

संबंधित बातम्या :

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक, ‘या’ 5 मुद्द्यांवर खल!

शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; लोकसभेच्या रणनीतीचाही प्रश्नच नाही: अजित पवार

ShivSena welcomes meeting between Sharad Pawar and Prashant Kishor

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.