आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. भविष्यात आमचे 22 खासदार होतील, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.

आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत
संजय राऊत, शिवसेना नेते.
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 11:34 AM

मुंबई : राज्याची सत्ता हाती आल्यापासून शिवसेनेने आपल्या विस्तारासाठी प्रयत्न सुरु केलेला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांशी संपर्क वाढवलेला आहे. तसेच पक्षविस्तारासंदर्भात ते वेगवेगळी विधानं करताना दिसतात. आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त बोलताना त्यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. दादरा आणि नगर हवेलमीमधून आमचा आणखी एक खासदार निवडून होईल. आमचा आकडा 22 वर जाईल, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.

आगामी निवडणुकीत आमचे 22 खासदार असतील

संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी शिवसेनेची आगामी वाटचाल, भूमिका यावर भाष्य केले. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 48 जागांपैकी 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता संपूर्ण देशाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना केंद्रस्थानी असेल, असे भाकीत संजय राऊत यांनी वर्तवले आहे. “शिवसेना पक्षप्रमुख पक्षाची दिशा ठरवतील. ठाकरे यांचे भाषण सकाळी 7.30 वाजता सुरु होईल. शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पूर्ण देश समजून घेऊ इच्छत आहे. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. आता आमचे 22 खासदार होतील. 2025  नंतर शिवसेना देश पातळीवरील राजकारणात केंद्रस्थानी असेल,” असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे काम

तसेच पुढे बोलताना “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण महत्वाचं आहे. महाराष्ट्र आणि देशात अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकत नाही. पण सर्व नियमाचं पालन करून मेळाव्याचे आोयजन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे काम होईल, असेदेखील संजय राऊत म्हणाले.

एनसीबीच्या कारवाईतील पैशांचा वापर देशविरोधी कारवायांसाठी 

विशेष म्हणजे पुढे बोलताना राऊत यांनी नोटबंदी, अमली पदार्थ तसेच इतर मुद्द्यांवर भाष्य केलं. अमली पदार्थांची तस्करी तसेच उलाढाल यांच्यातून येणारा पैसा हा देशविरोधी कारवायांसाठी वापरण्यात येतो, असं आरएएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात. देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार आहे. तरीही देशात असं होत असेल तर ते चुकीचं आहे. सरसंघचालक मोहन भागवत कोणाला जबाबदार धरणार आहेत. नोटबंदी करताना मोदी यांनी देशाला वचन दिलं. पण तसं काही झालं नाही. याच मुद्द्यावरुन चार वर्षानंतर सरसंघचालक चिंता व्यक्त करत केलेली आहे, त्यांच्या बोलण्याला एक महत्त्व असतं, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या :

शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, पालिका निवडणुकांच्या तोंडावर नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी करणार सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी करणार सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.