मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये

शिवसेनेने भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता त्याचा वचपा भाजपने माथेरानमध्ये काढला आहे.  शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये
Matheran Shiv Sena Corporators join BJP
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 10:56 AM
कोल्हापूर : शिवसेनेने (Shiv Sena) भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता त्याचा वचपा भाजपने (BJP) माथेरानमध्ये (Matheran) काढला आहे. माथेरान नगरपंचायतीत भाजपने शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत माथेरानच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.  (Shiv Senas 10 Corporator from Matheran joins BJP presence of Chandrakant Patil at Kolhapur Maharashtra)
माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या सह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं. काल म्हणजेच बुधवारी भाजपच्या मुक्ताईनगरच्या आजी-माजी 10 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र अवघ्या 12 तासात भाजपने हा वचपा तिकडे माथेरानमध्ये काढला. 14 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, शिवसेनेची सत्ताच पालटली आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.

भाजप प्रवेश केलेले माथेरान नगरपरिषदेचे 10 नगरसेवक

1) आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष 2) राकेश चौधरी, नगरसेवक 3) सोनम दाबेकर, नगरसेवक 4) प्रतिभा घावरे, नगरसेवक 5) सुषमा जाधव, नगरसेवक 6) प्रियांका कदम, नगरसेवक 7) ज्योती सोनवळे, नगरसेवक 8) संदीप कदम, नगरसेवक 9) चंद्रकांत जाधव, नगरसेवक 10) रुपाली आखाडे, नगरसेवक

मुक्ताईनगरात भाजपला धक्का 
मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी बुधवारी 26 मे रोजी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत या 10 आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य 4 जणांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला हा दुसरा मोठा धक्का मानला जातोय.
संबंधित बातम्या 
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.