शिवसेनेचे ‘पंचरत्न’ ईडीच्या रडारवर, 5 बडे नेते अडचणीत, कोणावर कोणता आरोप?

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) हे ईडीच्या  (ED) चौकशीसाठी हजर होत आहे. ईडीने अनिल परब यांना दोन वेळा समन्स बजावलं होतं. शिवसेनेचे पाच  बडे नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसतंय. परिवहन मंत्री अनिल परब हे 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत.

शिवसेनेचे 'पंचरत्न' ईडीच्या रडारवर, 5 बडे नेते अडचणीत, कोणावर कोणता आरोप?
Anil Parab_Bhawana Gawli_Anandrao Adsul
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 11:27 AM

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) हे ईडीच्या  (ED) चौकशीसाठी हजर होत आहे. ईडीने अनिल परब यांना दोन वेळा समन्स बजावलं होतं. त्यानंतर तिसऱ्या सन्मस बजावल्यानंतर अनिल परब हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. ईडीच्या रडारवर असलेले शिवसेनेचे हे पाचवे नेते आहेत.

अनिल परब यांची प्रतिक्रिया

मी काहीही चूक केलेली नाही, पण मला कोणत्या कारणासाठी समन्स बजावलं आहे याची माहिती नाही. मी आज ईडीच्या कार्यालयात जात आहे. मला जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर देणार. ईडीच्या चौकशीला जात आहे. मी शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन, मुलींची शपथ घेऊन सांगितलं होतं, मी काहीही चूक केलेली नाही, चौकशीला जात आहे, मला माहिती नाही का बोलावलं आहे, चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

मला ईडीने चौकशीबाबतचं कोणतंही कारण दिलेलं नाही. चौकशीला गेल्यानंतर मला समजेल. चौकशीला सहकार्य करणार आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं.

शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांना ईडीने समन्स बजवून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज अनिल परब हे ईडी कार्यालयात जात आहेत. पोलिसांनीही ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.

शिवसेनेचे 5 नेते ईडीच्या रडारवर

दरम्यान, शिवसेनेचे पाच  बडे नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसतंय. परिवहन मंत्री अनिल परब हे 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या अफरातफरीचे आहेत. दुसरीकडे यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी या सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. भावना गवळी यांनीही मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात भावना गवळी यांच्या कंपनीतील संचालकाला ईडीने अटक केली आहे. ईडीने सईद खान याला अटक करुन आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

प्रताप सरनाईक

याशिवाय शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अकडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी तब्बल सहा तास चालली होती. ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते.

आनंदराव अडसूळ

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना 27 सप्टेंबर रोजी ईडीने ताब्यात घेतलं. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे.

भावना गवळी ईडीच्या रडारवर

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर आहेत. भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना डिसेंबर 2020 मध्ये सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवण्यात आली होती. 55 लाखाच्या व्यवहाराप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली होती. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

संबंधित बातम्या  

आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात, तब्येत बिघडल्याने अॅम्ब्युलन्स बोलावली! 

शिवसेना नेते ईडीच्या निशाण्यावर, भावना गवळींचा निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.