शिवसैनिक आक्रमक! भाजप आमदाराच्या कार्यालयावर टरबूज फेको आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सांगलीमध्ये आक्रमक शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले आहे. भाजपा आमदाराच्या कार्यालयाबाहेर टरबूज फेकून शिवसैनिकांनी निधेष व्यक्त केला आहे.

शिवसैनिक आक्रमक! भाजप आमदाराच्या कार्यालयावर टरबूज फेको आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:45 PM

सांगली : शिवसेना (SHIVSENA) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सुरुवातीला त्यांना केवळ 13 आमदारांचा पाठिंबा होता. मात्र आता सुंत्राकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा 46 वर पोहोचला आहे. शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येनं फुटल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार संकटात आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. आज सांगलीमध्ये शिवसैनिकांनी आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर टरबूज फेक आंदोलन केले. या आंदोलना प्रकरणात पोलिसांकडून काही शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  यावेळी शिवसैनिकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.

पदाधिकारी आक्रमक

एकनाथ शिंदे यांनी शिवसेसोबत बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. आता एकनाथ शिंदे भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे.  आज शिवसेनेचे मिरज शहर अध्यक्ष चंद्रकांत मैंगुरे यांच्यासह विजय शिंदे गजानन मोरे यांनी भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर टरबूज फेकत आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यालयाबाहेर असलेल्या सुरेश खाडे यांच्या डिजिटल फलकावर देखील टरबूज फेकण्यात आले.

हे सुद्धा वाचा

आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वृत्तीचा आम्ही निषेध करतो असे आंदोलकांनी म्हटले आहे. दुसरीकडे आज राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्याने आता शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ राहिले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.