Sushant Singh case | ‘एम्स’च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला,मात्र एम्सच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली, असं अमेय घोले (Amey Ghole) यांनी म्हटलंय.

Sushant Singh case | 'एम्स'च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 2:43 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्या (Sushant Singh Rajput) असल्याचं अहवाल दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयाने दिल्यानंतर, शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला, मात्र एम्सच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली, असं शिवसेना नगरसेवक आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले (Amey Ghole) यांनी म्हटलंय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Shiv Senas Amey Ghole on Sushant Singh Rajputs AIIMS report)

“दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने सुशांत सिंहची आत्महत्या झाल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालामुळे राज्य सरकार मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस योग्य तपास करत होती हे सिद्ध होतंय. पण काहींनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला होता. एमच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली”, असं अमेय घोले म्हणाले.

सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली होती. मात्र, सुशांत (Sushant Singh Rajput) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र एम्सच्या अहवालाने, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणाऱ्यांना तोंडघशी पाडलं आहे.

एम्सचा अहवाल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केल्याचे कळते आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता.

(Shiv Senas Amey Ghole on Sushant Singh Rajputs AIIMS report)

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा  

Sushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द!

Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

ड्रग्ज देवाणघेवाणीसाठी सुशांतकडून वापर, रियाचा दावा, जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.