Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेल्या सेना आमदारांची गोची? सामनाचे 5 सवाल, ज्याची उत्तरं बंडखोर आमदार देतील?

Uddhav Thackeray : आता आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेल्या सेना आमदारांची गोची? सामनाचे 5 सवाल, ज्याची उत्तरं बंडखोर आमदार देतील?
एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेल्या सेना आमदारांची गोची? सामनाचे 5 सवाल, ज्याची उत्तरं बंडखोर आमदार देतील?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 12:50 PM

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केलं असून त्यांच्यासोबत 47 आमदारांनीही बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची खुर्चीच धोक्यात आल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. आमदारांच्या या बंडामुळे महाविकास आघाडीचं (maha vikas aghadi) अस्तित्त्वही धोक्यात आलं आहे. उद्या जर शिवसेनेला विरोधी पक्षात बसावं लागलं तर विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेकडे जाणरा नाही, अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. आपल्याच पक्षातील आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेने या आमदारांना पाच सवाल केले आहेत. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने हे पाच सवाल केले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदारांची गोची झाली आहे. या प्रश्नांची उत्तरे बंडखोर आमदार देतात की त्याकडे दुर्लक्ष करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पहिला सवाल

राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला व नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे?

हे सुद्धा वाचा

दुसरा सवाल

नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले व आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.

तिसरा सवाल

विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत. शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचमुळे ‘वेगळा गट’ करून आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही.

चौथा सवाल

आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले.

पाचवा सवाल

आता आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.