Eknath Shinde: खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की बंडखोरांची? सभागृह आणि सुप्रीम कोर्टातली लढाई निश्चित, वाचा काय आहेत नव्या शक्यता…
Udhhav Thackeray : शिवसेना नक्की कुणाची? उद्धव ठाकरेंची की बंडखोर एकनाथ शिंदेगटाची?
मुंबई : एकनाथ शिंदे… मागच्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव. ज्याने राज्याच्या राजकारणाला नव्या वळणावर नेलं अन् दावा केला की उद्धव ठाकरेची (Shivsena) शिवसेना खरी नव्हे तर आमचा गट हीच खरी शिवसेना आहे! ज्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. शिवसेना नक्की कुणाची हा प्रश्न अनेकांना पडला. आता ही लढाई आता सर्वोच्च न्यायलयात जाण्याची शक्यता आहे. याचे राजकीय आणि कायदेशीर कंगोरे काय आहेत, याचा उहापोह करण्याचा प्रयत्न. शिवसेना नक्की कुणाची? उद्धव ठाकरेंची (Udhhav Thackeray) की बंडखोर एकनाथ शिंदेगटाची? (Eknath Shinde) वाचा…
दिवस होता 19 जून. साल होतं 1966. मराठी माणसाला आपल्या हक्कांसाठी लढणारी एक संघटना मिळाली होती. ज्याचं नाव शिवसेना. बाळासाहेब केशव उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनी एक नवी संघटान उभी केली. मराठी माणसांच्या हक्कांसाठी, हिंदुत्वाच्या वृद्धीसाठी ही संघटना आपण उभी करत असल्याचं म्हणत बाळासाहेबांनी सांगितलं. त्याच शिवसेनेत सध्या उभी फूट पडलीय. एकनाथ शिंदेंनी आपल्या समर्थकांसोबत बंड केलंय. तर दुसरीकडे बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे आहे. खरी सेना कुणाची असा प्रश्न चर्चेत आला आहे.
बंडानंतर एकनाथ शिंदेंसमोर काय पर्याय
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केलं. त्यानंतर त्यांच्यासमोर काही पर्याय उभे राहतात. त्यांच्या आधारे एकनाथ शिंदेंचं बंड सक्सेसफुल होऊ शकतं. याशिवाय एखाद्या दुसऱ्या पक्षात सामील होणं. किंवा राजीनामे देत पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं. हे तीनही पर्याय त्यांना अडचणीचे आहेत.
शिवसेना या संघटनेत उभी फूट
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील काही आमदारांचा पाठिंबा आहे खरा. पण त्यांना जर आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा खरा ठरवायचा असेल तर त्यांना शिवसेना या पक्ष संघटनेत फूट पाडावी लागेल. त्यांना 2/3 शिवसैनिकांचा पाठिंबा मिळवावा लागेल. जी गोष्ट एवढी सोपी नाही… कारण शिवसैनिकांना शिवसेना अन् बाळासाहेब ठाकरे या दोन गोष्टींमधून उर्जा मिळते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदेंना साथ देण्याची शक्यता धूसर आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यावर आणि राजीनामा दिल्यावरही आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा शब्द शिवसैनिकांनी दिला.
उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर कब्जा मिळवण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी त्यानी तगडी फिल्डिंग लावली आहे. पण शिंदेंनी एवढं मोठं पाऊल उचलल्यानंतर उद्धव ठाकरेही शांत राहणार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकलाय. त्याविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे.
धनुष्यबाण शिंदेंना मिळण्याची शक्यता धूसर
शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण या चिन्ह्यावर शिंदे गटाने दावा केला आहे. पण ते मिळवणं तितकंस सोपं नाही. कारण शिवसेना या पक्षाची स्वत: ची राज्यघटना आहे. त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या हातात सर्वाधिक अधिकार आहेत. त्यांचा निर्णय अंतिम असतो. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना पक्षातून काढून टाकण्याचीही शक्यता आहे. तसं केल्यास त्यामुळे एकनाथ शिंदेंची अडचण होऊ शकते.