भाजप आणि शिवसेनेकडूनही 288 जागांवर चाचपणी सुरु?
शिवसेनेनेही सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख -शाखाप्रमुखांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे युतीतील दोन्ही (Shivsena BJP 288 seats) मित्रपक्षांनी स्वबळाची तयारी केल्याचं प्राथमिक चित्र सध्या निर्माण झालं आहे.
मुंबई : युतीचं घोडं अडलेलं असताना भाजप आणि शिवसेनेने 288 जागांची चाचपणी (Shivsena BJP 288 seats) सुरु केल्याचं चित्र आहे. कारण, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यात विभागनिहाय आढावा घेत आहेत. तर शिवसेनेनेही सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख -शाखाप्रमुखांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे युतीतील दोन्ही (Shivsena BJP 288 seats) मित्रपक्षांनी स्वबळाची तयारी केल्याचं प्राथमिक चित्र सध्या निर्माण झालं आहे.
जेपी नड्डा मुंबई दौऱ्यावर
मुंबई आणि ठाण्यात जिथे शिवसेना प्रबळ आहे, तिथेच नड्डा यांच्या बैठका होत आहेत. शिवसेनेला सोबत नाही घेतलं तर काय होईल, काय नाही याची चाचपणी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसांच्या बैठकीचा निकाल नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांना देणार असल्याचंही बोललं जातंय.
भाजपच्या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत मुंबई चे तीन खासदार, आमदार, नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती होती. भाजपचे 60 प्रवासी कार्यकर्ते मुंबईत आहेत. बूथ रचना स्थानिक समस्या जाणून घेऊन त्यानुसार प्रचार ठरवला जाणार आहे.
शिवसेनेनेही बैठक बोलावली
भाजपच्या जोर बैठकानंतर आता शिवसेनेचीही 288 मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचं दिसतंय. रविवारी शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख -शाखाप्रमुखांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 288 जागांचा आढावा घेणार आहेत.