बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 23 उमेदवार रिंगणात, कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा?

शिवसेनेनं आपले 23 उमेदवार बिहार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. बिहारमध्ये शिवसेनेचा प्रभाव नसला तरी शिवसेना उमेदवारांमुळे कुणाचा फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुशांत प्रकरणात नितीश कुमार आणि भाजपला प्रत्युतर देण्यासाठी शिवसेनेनं बिहारमध्ये शड्डू ठोकल्याचीही चर्चा सुरु आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 23 उमेदवार रिंगणात, कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा?
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 12:37 PM

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार आहे. बिहारमध्ये भाजप आणि JDU विरुद्ध काँग्रेस आणि RJD असा जोरदार सामना पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेनेनं आपले 23 उमेदवार बिहार निवडणुकीच्या मैदानात उतरवले असल्यानं रंगत अजून वाढली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे तीन उमेदवार, दुसऱ्या टप्प्यात नऊ उमेदवार तर तिसऱ्या टप्प्यात 11 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. (23 shivsena candidate will contest in bihar aasembly election)

शिवसेना उमेदवारांची यादी पाहिल्यास अजून एक बाब लक्षात येते. ती म्हणजे पालीगंज आणि मोरवा मतदारसंघात मनीष कुमार या एकाच नावाचे उमेदवार आहेत. तर संजय कुमार या एकाच नावाचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. ते चिरैय्या, फुलपराश आणि बेनीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुशांत प्रकरणावरुन राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेची मोठी नाचक्की झाली. त्यामुळं भाजप आणि नितीश कुमार यांना शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी बिहारमध्ये शिवसेनेनं उमेदवार उतरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप उमेदवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेना उमेदवारांची यादी आणि मतदारसंघ

पहिला टप्पा

  • मनीष कुमार – पालीगंज
  • ब्युटी सिन्हा – गया शहर
  • मृत्युंजय कुमार – वजीरगंज

दुसरा टप्पा

  • संजय कुमार – चिरैय्या
  • संजय कुमार – फुलपराश
  • संजय कुमार झा – बेनीपूर
  • रंजय कुमार सिंह – तरैय्या
  • विनिता कुमारी – अस्थवां
  • रवींद्र कुमार – मनेर
  • जयमाला देवी – राघोपुर
  • विनोद बैठा – भोरे
  • शंकर महसेठ – मधुबनी

तिसरा टप्पा

  • प्रदीप कुमार सिंह – औराई
  • शत्रूघन पासवान – कल्याणपुर
  • सुभाषचंद्र पासवान – बनमंखी
  • नवीन कुमार मल्लीक – ठाकूरगंज
  • नंद कुमार – समस्तीपुर
  • पुष्पांकुमारी – सराय रंजन
  • मनीष कुमार – मोरवा
  • शिवनाथ मल्लीक – किशनगंज
  • चंदन कु. यादव – बहादुरगंज
  • गुंजा देवी – नरपरगंज
  • नागेंद्र चंद्र मंडल – मनिहारी

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने यांच्यासह एकूण २२ जणांचा समावेश आहे.

बिहारचे राजकीय बलाबल

  • एनडीए : 125
  • राजद : 80
  • काँग्रेस : 26
  • सीपीआय : 3
  • एचएएम : 1
  • एमआयएम : 1
  • अपक्ष : 5
  • खाली : 2
  • एकूण जागा 243 सीट

संबंधित बातम्या:

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार, पंतप्रधान मोदींना विश्वास, RJD आणि काँग्रेसवर सडकून टीका

दोन कोटी लोकांना रोजगार का मिळाला नाही? बिहार विधानसभेच्या मैदानात राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

23 shivsena candidate will contest in bihar aasembly election

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.