Vidhan Parishad | निष्ठावान शिवसैनिकाला विधान परिषदेचं बक्षीस, विजय करंजकर यांची उमेदवारी निश्चित
शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर यांची नावं निश्चित आहेत
नाशिक : निष्ठावान शिवसैनिक विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांना विधान परिषदेची उमेदवारी (Governor Elected Vidhan Parishad MLC) मिळाल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट डावलल्यानंतर करंजकरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वरिष्ठ सभागृहात संधी दिल्याचं दिसत आहे. शिवसेनेच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदाची धुरा वाहणाऱ्या विजय करंजकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. (Shivsena Candidature to Vijay Karanjkar as Governor Elected Vidhan Parishad MLC)
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. या यादीतील काही नावं समोर आली आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. एकनाथ खडसे, सचिन सावंत, रजनी पाटील या उमेदवारांची नावं यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.
कोण आहेत विजय करंजकर?
शिवसेनेच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी विजय करंजकर यांच्याकडे आहे. करंजकरांनी तरुण वयात शिवसेनेत प्रवेश केला. लहान कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख हा मोठा प्रवास त्यांनी केलेला आहे. नाशिकला दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून देण्यातही करंजकरांचा मोठा वाटा मानला जातो.
विजय करंजकर यांचे नाव गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या शर्यतीत होते. परंतु खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी मिळाल्याने करंजकरांचे नाव मागे पाडले. भविष्यात न्याय देण्याचं आश्वासन करंजकरांना देण्यात आलं होतं. त्यामुळे विजय करंजकर यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याची चर्चा आधीपासूनच होती.
शिवसेनेकडून कोणाला विधानपरिषदेवर पाठवलं जाणार याबाबत उत्सुकता होती. शिवसेनेनेही आपले चार उमेदवार ठरवले असून, ही नावं बंद लिफाफ्यातून राज्यपालांकडे सोपवण्यात आली. या नावांबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार आहे. तर याशिवाय सेनेचा बुलंद आवाज आणि शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील (Nitin Banugade Patil) यांनाही सेनेने विधानपरिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Suryavasnhi) यांचाही समावेश आहे.
12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?
काँग्रेस
1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वणगे – कला
(Shivsena Candidature to Vijay Karanjkar as Governor Elected Vidhan Parishad MLC)
राष्ट्रवादी काँग्रेस
1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला
शिवसेना
1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील – 3) विजय करंजकर – 4) चंद्रकांत रघुवंशी –
आनंद शिंदे आणि अनिरुद्ध वनकर यांना विधान परिषदेची संधी?; दलित मतांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेचhttps://t.co/qrZjUXuPPc#mlc #MaharashtraGovernment #BhagatSinghKoshyari #anandshinde #aniruddhavankar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
संबंधित बातम्या :
विधानपरिषदेत ‘शिंदेशाही बाणा’, राष्ट्रवादीकडून आनंद शिंदेंचं तिकीट जवळपास कन्फर्म
राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे
(Shivsena Candidature to Vijay Karanjkar as Governor Elected Vidhan Parishad MLC)