सुप्रीम कोर्टात आकड्यांवरून घमासान, आमच्याकडे अजूनही बहुमत, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा मोठा दावा!

shivsena case today | आज सुरुवातीलाच घटनापीठातील सदस्यांमध्ये राज्यपालांच्या अधिकारांवरून चर्चा झाली. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या आकड्यांवरून मोठं भाष्य केलंय.

सुप्रीम कोर्टात आकड्यांवरून घमासान, आमच्याकडे अजूनही बहुमत, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा मोठा दावा!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 12:09 PM

नवी दिल्लीः आमच्याकडे अजूनही बहुमताचा आकडा आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) केला आहे. भाजपकडे तेवढं संख्याबळ नाही. त्यांना केवळ अपक्षांची साथ आहे, असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर म्हटलंय. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सलग दोन दिवस युक्तीवाद केल्यानंतर आज कोर्टाने दोन्ही पक्षाच्या वकिलांना लेखी स्वरुपात म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. आज सकाळपासून पुन्हा कोर्टासमोरील या खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे. सुरुवातीलाच घटनापीठातील सदस्यांमध्ये राज्यपालांच्या अधिकारांवरून चर्चा झाली. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या आकड्यांवरून मोठं भाष्य केलंय.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

  • कपिल सिब्बल म्हणाले सरकार पाडण्यासाठी राज्यपाल मदत करू शकत नाहीत. यानंतर तुमच्याकडे बहुमत होतं, हे कसं म्हणू शकता, असा सवाल सिब्बल यांना केला. अपात्र आमदारांचा आकडा यातून वगळला तरी ते कसं होऊ शकतं, हे सांगा, असं कोर्ट म्हणालं. यानंतर कपिल सिब्बल यांनी
  • शिंदे-फडणवीस यांच्याकडे 127 जणांचं संख्याबळ नाही, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. भाजपकडे 106 संख्याबळ आहे. शिंदे गटाकडील आमदार आणि अपात्रतेची
  • तर सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांनी दिलेल्या आकडेवारीवरून भाष्य केलं. शिवसेनेचे 55, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 यांची बेरीज करून 106 आकडा होतो. जो 127 पेक्षा कमी आहे, असं वक्तव्य केलं. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी आमच्याकडे 14 अपक्षांची साथ होती, असा मोठा दावा केला.
  • कपिल सिब्बल यांनी कोर्टात प्रश्न उपस्थित केला की, 39 किंवा 34 आमदार राज्यपालांकडे जातात आणि ते शिवसेनेत आहे म्हणतात आणि शपथविधीचा दावा करतात ,हे कसं होऊ शकतं.. भाजपला वाटलं असतं आम्ही बहुमत गमावलं आहे, तर त्यांनी राज्यपालांकडे जायला हवं होतं. पण इथे राज्यपालांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.
  • राज्यपालांनी त्या 39 आमदारांनी बंडखोरी केल्याचं गृहित धरलं आणि तिथेच खरी समस्या आहे. आम्ही अल्पमतात आहोत की बहुमतात, हे राज्यपाल सांगू शकत नाहीत. सरकार अस्थिर आहे, हे राज्यपाल सांगू शकत नाहीत, असं वक्तव्य कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलं.
Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.