Pandharpur Assembly By-Election : महाविकास आघाडीत बिघाडी?; निवडणुकीआधीच शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची बंडखोरी
महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुखाने येथे थेट बंडखोरी केली आहे. (shivsena shaila godse pandharpur mangalwedha)
सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Pandharpur Assembly By-Election) जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ खिशात घालण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर येथे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे (Shaila Godse) यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. (Shivsena district women chief Shaila Godse file nomination for upcoming Pandharpur Mangalwedha state assembly by election)
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीला येथे राष्ट्रवादी आणि भाजप अशी थेट लढत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंडोरी केल्यानंतर आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनीसुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन केले.
राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अपला उमेदवार कोण हे अद्याप जाहीर केले नाही. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे येथे भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नसून येथे भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा
उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवाचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पक्षाने कारवाई केली तरी उमेदवारीवर ठाम
दरम्यान, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे येथे निडणूक अटीतटीची होणार असल्याचे बोलले जात आहे. उमेदावारी अर्ज दाखल केल्यानंतर जनतेची उमेदवारी म्हणून मी अर्ज भरला असल्याचे गोडसे यांनी सांगितले. तसेच, बंडखोरी करुन अर्ज भरल्यामुळे शिवसेना पक्षाने कारवाई केली तरी आपण उमेदवारीवर ठाम असल्याचेही गोडसे म्हणाल्या. गोडसे यांच्या या भूमिकेमुळे आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.
इतर बातम्या :
पंढरपूर पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, भाजपकडून राम शिंदेंना तिकीट देण्याच्या हालचाली