राज्यात कोरोनाचं सावट, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ‘ऑनलाईन’?

शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा कोरोनामुळे अडचणीत सापडला आहे. (Shivsena Dussehra Melava May celebrate through Social Media)

राज्यात कोरोनाचं सावट, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा 'ऑनलाईन'?
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 9:12 AM

मुंबई : शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या सावटामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात न घालण्याचा शिवसेनेचा विचार आहे. त्यामुळे विचारांचे सोने मैदानात लुटण्याऐवजी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कसे लुटता येईल, या दृष्टीने शिवसेना तयारी करत असल्याचे बोललं जात आहे. (Shivsena Dussehra Melava May celebrate through Social Media)

महाराष्ट्रात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसरा मेळावा धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या सोहळ्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

राज्यात अनलॉक सुरू असले तरी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. राज्य सरकारने लोकलसेवा, जिम, सिनेमागृह अजून सुरू केलेली नाहीत. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर राज्यभरातून होणारी गर्दी टाळण्याकडे शिवसेना नेतृत्वाचा कल आहे.

येत्या 25 ऑक्टोबरला दसरा आहे. हा दसरा मेळावा सोशल मीडियाच्या माध्यमातून पार पाडावा. त्यामुळे पक्षाची स्थापनेपासून सुरू असलेली परंपरा खंडित होणार नाही, असा शिवसेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. दरम्यान यापूर्वी पावसामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमका कसा होणार याकडे शिवसैनिकांसह सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Shivsena Dussehra Melava May celebrate through Social Media)

संबंधित बातम्या : 

Amol Kolhe | महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत, अमोल कोल्हेंचा सवाल

आता काशी, मथुरेची चर्चा सुरू झालीय, देशाचं सामाजिक ऐक्य कसं टिकणार?; पवारांचा सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.