ईडीची भीती दाखवल्याने शिवसेना युतीसाठी तयार : विखे पाटील
पुणे : भाजप-शिवसेना युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीवर जोरदार हल्ला केलाय. युती अनैतिक, अभद्र, स्वार्थी आणि मतलबी आसल्याचा आरोप त्यांनी केला. तर चौकीदार चोर हैं म्हणणारे चोरावर मोर झालेत. शिवसेनेचा हा मांडवलीचा प्रयोग असून ईडीच्या […]
पुणे : भाजप-शिवसेना युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीवर जोरदार हल्ला केलाय. युती अनैतिक, अभद्र, स्वार्थी आणि मतलबी आसल्याचा आरोप त्यांनी केला. तर चौकीदार चोर हैं म्हणणारे चोरावर मोर झालेत. शिवसेनेचा हा मांडवलीचा प्रयोग असून ईडीच्या भीतीने युती केल्याचा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला.
विखे पाटील पुण्यात काँग्रेस भवनला पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विखे पाटलांनी युतीवरुन भाजप-शिवसेनेचे वाभाडे काढले. युतीचा निर्णय हा शिवसेनेचा मांडवली करण्याचा प्रयोग आहे. उद्धव ठाकरे भाजपला निर्लज्ज म्हणत होते, चौकीदार चोर म्हणाले, तर सामना अग्रलेखात भाजप शहिदांच्या मढ्यावरचं लोणी खात आसल्याचं आरोप केलाय. तर दसरा मेळाव्यात पहले मंदिर फीर सरकार अशी घोषणा केली. पहिले राम मंदीर आणि शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. मात्र दोन्हीवर काहीच झालं नाही मग आता उद्धव ठाकरे यांनी काय चिरीमिरी घेतली याचं उत्तर द्यावं, असं आव्हान विखे पाटलांनी दिलंय.
भाजपने अंमलबजावणी संचालनालयाची भीती दाखवून युती करायला लावल्याचा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला. मात्र जनता सुज्ञ असून युतीला धडा शिकवेल, असंही विखे पाटलांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी भाजपचाही समाचार घेतला. भाजपने युती करताना स्वाभिमान गहाण ठेवलाय. पंतप्रधान आणि अमित शाह यांचा जाहीर अपमान केला. मात्र युतीसाठी पुन्हा शिवसेनेच्या दारात गेलेत. दोघांनी एकामेकांची औकात काढली. मात्र आता गळ्यात गळे घालून गोडवे गात असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला.
पुलवामा हल्ल्या प्रकरणी बोलताना विखे पाटलांनी पंतप्रधानांवर निशाना साधलाय. पंतप्रधान यवतमाळ आणि धुळ्याला उद्घाटनाला जातात. मात्र भुमीपुत्रांना शहिदांच्या कुटुंबीयांना भेटणं उचित वाटलं नाही. मोदींना देशाचा राजकीय अजेंडा जास्त महत्वाचा वाटत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला. तर पुलवामा हल्ला प्रकरणी इंटेलिजन्सचं अपयश आहे, काही माहिती मिळाली मात्र त्याकडे दुर्लक्ष झालं. इतकी सुरक्षा असताना स्फोटकांची गाडी जातेच कशी, याबाबत चौकशी करण्याची गरज आहे, असं विखे पाटील म्हणाले.
भाजप आणि माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सैद यांच्या काळात आतंकवाद वाढल्याचा आरोप विखे पाटलांनी केलाय. मुफ्ती यांनी अनेक गुन्हेगारांना मोकळं केलं. त्यामुळे सत्तेत असताना आतंकवाद फोफावला. तर 56 इंच छाती म्हणणार्या पंतप्रधानांच्या काळात सर्वात जास्त जवान शहीद झाल्याचा आरोप विखे पाटलांनी केला.