ठाकरे सरकारने वर्षभर काम केलंय, त्यासाठी राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अनिल परबांचा टोला

सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. (Anil Parab Comment On Narayan Rane Criticism) 

ठाकरे सरकारने वर्षभर काम केलंय, त्यासाठी राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अनिल परबांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 4:01 PM

मुंबई : “राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. (Anil Parab Comment On Narayan Rane Criticism)

“ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली. कोरोनात जगाची दैना झाली आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष काम नाही,” असेही अनिल परब म्हणाले.

“कारशेडसाठी जमिनीबाबत आम्ही अभ्यास करुनच कांजूरमार्गला नेण्याचा संकल्प केला. मराठा आरक्षण टिकावं यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. चर्चा सुरू आहे. मात्र हा विषय कोर्टात आहे. त्यामुळे कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ,” अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

“अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव विधानपरिषदेसाठी पाठवलं आहे. त्या उद्या देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करु शकतात. विधानपरिषदेसाठी कॅबिनेटची मान्यता घेऊन नावं पाठवली आहेत. त्यामुळे सध्या निर्णयाची वाट पाहत आहोत,” असेही परब म्हणाले.

“हिवाळी अधिवेशनाबाबत परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय”

“पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेबाबत अद्याप काहीही माहिती नाही. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनाबाबत 4 डिसेंबरला सल्लागार समितीची मीटिंग होईल. त्यावेळी परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय होईल,” असेही अनिल परब यांनी सांगितले.(Anil Parab Comment On Narayan Rane Criticism)

संबंधित बातम्या : 

सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

फडणवीसांच्या काळातच मराठा, धनगर मोर्चे निघाले, प्रश्न मार्गी का लावले नाही?; शशिकांत शिंदेंचा सवाल

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.