“किरीट बोंबलत फिरतात तेव्हा कमळाबाई कुठे लपुन बसते?” दिपाली सय्यद यांचा सोमय्यांकडे मोर्चा

दिपाली सय्यद या दररोज भाजपवर परखड शब्दात टीका करताना दिसत आहेत. आज त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना टार्गेट केलंय.

किरीट बोंबलत फिरतात तेव्हा कमळाबाई कुठे लपुन बसते? दिपाली सय्यद यांचा सोमय्यांकडे मोर्चा
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 5:21 PM

मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) या दररोज भाजपवर परखड शब्दात टीका करताना दिसत आहेत. आज त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांना टार्गेट केलंय. त्यांनी ट्विटच्या माध्यामातून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडलेत. “दिल्लीतल्या बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमळाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडगा ढोंग करतंय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतंय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार”, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

दिपाली सय्यद यांचं ट्विट

दिपाली सय्यद यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार प्रहार केलाय. “दिल्लीतल्या बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमळाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडगा ढोंग करतंय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतंय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार”, असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

दिपाली सय्यद मागच्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून भाजपला प्रश्न विचारलेत. काही दिवसांआधी त्यांनी असंच ट्विट केलं होतं. “अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्याबद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ… दिल्लीत मुजरा करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ! दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही! जय महाराष्ट्र…” , असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं.याची जोरदार चर्चा झाली.

पंतप्रधानांवर टीकास्त्र

दिपाली सय्यद विरुद्ध भाजप असा सामना सध्या रंगतोय. दिपाली सातत्याने भाजपवर टीकेचे बाण सोडत आहेत. त्यांनी पंतप्रधानांबाबत आणखी एक विधान केलं होतं. जे प्रचंड चर्चेत आहे. दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर परखड शब्दात टीका केली. “नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. शिवाय “वाढती महागाई , दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या”, असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा झाली.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.