भाजपच्या गद्दारीमुळं 2019 ला पराभव, शिवसेना नेत्याचं टीकास्त्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा

मुख्यमंत्री शांत स्वभावाचे आहेत. महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आजून ही सुधारावं, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.

भाजपच्या गद्दारीमुळं 2019 ला पराभव, शिवसेना नेत्याचं टीकास्त्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा
राजेश क्षीरसागर
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 7:11 AM

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचं डिसेंबरमध्ये निधन झालं होतं. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2019 ला निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तत्कालीन शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचा पराभव केला होता. आता शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपची (BJP) गद्दारी हे माझ्या पराभवाचं प्रमुख कारण असल्याचं क्षीरसागर म्हणाले. 10 वर्षात कोणताही प्रश्न सोडला नाही,विकासात सामाजिक कामात कुठे कमी पडलो नाही, मात्र, मला दुर्दैवाने पराभवाला सामोर जावं लागलं, असं राजेश क्षीरसागर म्हणाले. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास पोटनिवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत.

भाजपची गद्दारी हे पराभवांचं प्रमुख कारण

चंद्रकांत जाधव हे आरएसएसचे होते,भाजपला जागा मिळाली नाही म्हणून ते काँग्रेस मध्ये गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात कालचं कबुली दिली आहे. भाजपची गद्दारी हे माझ्या पराभवाच प्रमुख कारण आहे, असं राजेश क्षीरसागर म्हणाले. काँग्रेस नेत्यांनी ही माझ्या बद्दल गैरसमज पसरवले होते. मी निवडून आलो असतो तर मंत्रिमंडळात गेलो असतो. मात्र, भाजपकडून शत प्रतिशत सुरू झाल्या पासून ते मित्रांना विसरले, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.

मी निवडणूक लढवली तर 50 हजारच्या लीडनं विजयी होईन

राजेश क्षीरसागर यांनी दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकला नाही, असं म्हटलंय. मग, जिल्हा बँकेत काँग्रेस,राष्ट्रवादी ला भाजप ला सोबत घ्यावस का वाटलं? शिवसेनेवर अन्याय होतोय ही भावना शिवसैनिकांमध्ये आहे. पोटनिवडणुकीत भाजप बाय देणार नाही मात्र, मी लढवली तर 50 हजारांच्या फरकाने निवडून येईल.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून कोणताही निधी दिला जात नाही, असंही राजेश क्षीरसागर म्हणाले. मुख्यमंत्री शांत स्वभावाचे आहेत. महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आजून ही सुधारावं. पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर शिवसेना ही निवडणूक फक्त लढवणारच नाहीतर जिंकूनही दाखवेल.

इतर बातम्या:

Aurangabad: शहरात सध्या एकच चर्चा, औरंगाबादला कोणतं गिफ्ट मिळणार? डॉ. भागवत कराडांच्या ट्विटचा अर्थ काय?

नाशिक महापालिकेचा अजब तर्क, तिसऱ्या लाटेत 17 हजार मृत्यूचा अंदाज, 3 कोटींचं टेंडर, चौफेर टीकेनंतर सारवासारव

Shivsena leader Rajesh Kshirsagar slam BJP for his defeat in Assembly Election from North Kolhapur

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.