Breaking News : शिवसेनेला अमरावतीत मोठं खिंडार, शिवसेनेचा ‘हा’ नेता शिंदेगटात नव्हे तर भाजपमध्ये प्रवेश करणार
या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. वानखेडे हे अमरावतीतील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत असंख्य शिवसैनिकही भाजपमध्ये जाणार असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.
अमरावती: आधीच फाटाफुटीने हैराण झालेल्या शिवसेनेला (shivsena) आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे आज शिंदे गटात नव्हे तर थेट भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार आहेत. आज दुपारी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजेश वानखडे यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. वानखेडे हे अमरावतीतील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत असंख्य शिवसैनिकही भाजपमध्ये जाणार असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.