ठाकरे सरकार अस्थिर करण्याच्या आरोप! आता रामदास कदमांचं मनसे नेत्याला प्रत्युत्तर

रामदास कदम यांनी महाविकास आघा़डी सरकार अस्थित करण्याचं काम केल्याचा गंभीर आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केलाय. खेडेकरांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता रामदास कदम यांनी खेडेकरांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

ठाकरे सरकार अस्थिर करण्याच्या आरोप! आता रामदास कदमांचं मनसे नेत्याला प्रत्युत्तर
रामदास कदम, वैभव खेडेकर
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 12:50 PM

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांनी महाविकास आघा़डी सरकार अस्थित करण्याचं काम केल्याचा गंभीर आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केलाय. खेडेकरांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता रामदास कदम यांनी खेडेकरांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. वैभव खेडेकर यांची बरीच प्रकरणं मी बाहेर काढली. त्यानंतर ते बिथरले आणि त्यांनी माझ्यावर आरोप केल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय. (Ramdas Kadam’s reply to MNS general secretary Vaibhav Khedekar )

वैभव खेडेकर यांची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यानंतर ते बिथरले आणि त्यांनी माझ्यावर आरोप केला की परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टची तक्रार मी किरीट सोमय्यांकडे केली. मी सोमय्यांचं थोबाडही कधी पाहिलं नाही. मी यापुढे कुठलंही बद घेणार नाही, असं घोषित करणाचा मीच आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतोच कुठे. हे सरकार पाडणं म्हणजे माझ्याच पायावर धोंडा मारण्यासारखं आहे. मग मी असं का करेन? असा सवाल रामदास कदमांनी केलाय.

वैभव खेडेकर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना मी वैभव खेडेकर यांच्यावर मानहानीचा दावा करतोय, असा इशाराही रामदास कदमांनी केला आहे. तसंच प्रताप सरनाईक यांची नाराजी हा विषय जुना झाला असल्याचं कदम म्हणाले.

खेडेकर यांचा नेमका आरोप काय?

‘परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहीती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली. त्यानंतर ती माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांना दिली,’ असा खळबळजनक दावा खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप खेडेकर यांनी केलाय. किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या बेनामी संपत्तीचे माहिती जगासमोर आणावी आणि ईडीची चौकशी लावावी, अशी मागणीही खेडेकर यांनी केली आहे.

‘खेड पालिकेसाठी खेडेकरांनी दंड थोपटले’

“रामदास कदम यांनी केवळ त्यांच्या मुलाच्या आमदारकीच्या काळात खेड पालिकेची सत्ता मिळवता यावी, यासाठी माझ्या विरोधात कट रचला आहे. रामदास कदम हे अधिकाऱ्यांचा वापर करुन सर्वसामान्य कार्यकर्त्यांविरोधात मला राजकारणापासून दूर नेण्याचा कट रचला जातोय. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे. मी लढवय्या आहे. गेल्या पंधरा वर्षे शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. माझ्या सोबत थोडे कार्यकर्ते असले तरी ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सत्तेत येईन.”

इतर बातम्या :

‘लखोबा लोखंडे’चं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का?, रुपाली चाकणकरांचा सवाल

माध्यमं, उद्योगपती, राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करत भाजपकडून ब्लॅकमेलिंगचं काम, पटोलेंचा गंभीर आरोप

Ramdas Kadam’s reply to MNS general secretary Vaibhav Khedekar

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.