‘ती’ काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती: संजय राऊत

हाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? | Sanjay raut

'ती' काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती: संजय राऊत
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 2:32 PM

मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि माझ्या गळाभेटीत काय गैर आहे. ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती, अशी मिश्किल टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. संजय राऊत यांनी कन्या पूर्वर्शी हिचा साखरपुडा रविवारी संपन्न झाला. या समारंभाला राजकीय वर्तुळातील अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही या समारंभाला आले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी समारंभाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. (Sanjay Raut daughter Purvashi raut engagement ceremony)

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांकडून संजय राऊत यांनी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? मी फडणवीसांची गळाभेट घेतली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची गळाभेट नव्हे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय नेते एकमेकांच्या घरी अशा समारंभांसाठी जात असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

नेमकं काय घडलं होतं?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

वेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. त्यानंतर नव्या जोडप्यासह नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसोबत फडणवीसांनी फोटो काढले. त्यानंतर दरेकर यांनी पुढे होत नव्या जोडप्याला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तेव्हा राऊतांनीही पुढे होत दरेकरांच्या हातात हात दिला.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांचा जावई पाहिला का? कन्येच्या साखरपुड्याचे खास फोटो तुमच्यासाठी!

(Sanjay Raut daughter Purvashi raut engagement ceremony)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.